कादवड येथे काळभैरव जयंती नमित्ताने आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.

 

चिपळूण/लोकनिर्माण प्रतिनिधी (संतोष शिंदे) 

       कादवड क्रीडा मंडळ कादवड ने काळभैरव जयंती निमित्त आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखाने पार पडला.या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद 'जय हनुमान टेरव' संघाने पटकावले.                                   


        काळभैरव मंदिरामध्ये देवतांचे दर्शन घेण्यासाठी चिपळूण - संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखरजी निकम हे उपस्थित होते त्यांचा यथोचित सन्मान ग्रामस्थांनी केला.



 या स्पर्धेसाठी चिपळूण तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत यादव,  तसेच चिपळूण तालुक्याचे माजी सभापती बळीरामराव शिंदे हे सुध्दा उपस्थित होते  या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी क्रीडारसिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.



या स्पर्धेसाठी मंडळाचे आधारस्तंभ राकेश शिंदे व संतोष कृ. शिंदे यांनी विशेष योगदान दिले.या स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कादवड क्रीडा मंडळ कादवड चे अध्यक्ष अक्षय शिंदे सचिव अनंत शिंदे व सहकारी परिक्षीत शिंदे,भावेश शिंदे ,समीर शिंदे, गौरव शिंदे , रणजित शिंदे, श्रेयस शिंदे ,उपेंद्र, कल्पेश,मंदार, ओमकार, सिद्धेश बंधू , निखिल आणि इतर कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले. श्रींच्या जन्मानंतर महिलांनी पाळणा म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर भजन झाले व दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image