खेड लोकनिर्माण प्रतिनिधी
खेडचे पत्रकार दिलीप स.देवळेकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा २०२५ चा पत्रकार भूषण पुरस्कार गृह राज्यमंत्री मा. ना. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते सहपत्नीक गौरवण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर होते अनिलराज रोकडे या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, नंदकुमार गुजराथी, कोषाध्यक्ष संतोष बाणे,, तसेच श्री. दिलीप शेट्ये (संयुक्त कार्यालय) यांचाही सक्रिय सहभाग होता.
या मेळाव्यात कोकणातील.नामवंत पत्रकार म्हणून "जेष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना गौरविण्यात आले.गेली अनेकवर्ष दिलिप देवळेकर पत्रकारीता क्षेत्रात भरीव असं कार्य करत आहेत.
एक अभ्यासू व उच्च शिक्षित पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. समाजातील सोशीत, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा पुढाकार असतो, आदर्श, निर्भिड पत्रकार अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
साहित्यकि, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पत्रकार भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.