ग्रामपंचायत गुणदे च्या वतीने संपूर्ण गावात वृक्षारोपण, एका आठवड्यात पाचशे झाडे लावण्याचा व संवर्धनाचा ग्रामपंचायतीचा संकल्प.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे) पंचायत समिती खेड यांच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत गुणदे च्या वतीने १३ जुलै रोजी संपूर्ण गावात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीने दिलेल्या दोनशे झाडांमध्ये आणखी तीनशे झाडांची भर ग्रामपंचायतीने घातली आणि पाचशे झाडांचे वृक्षारोपण गुणदे येथील ग्रामदैवत, अंगणवाड्य…
