योग दिनानिमित्त !! ( शरिराची आरती ) कवी - विलास देवळेकर


 सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता शरिराची
नुरवी पुरवी कृपा वायू प्रदूषणाची 
सर्वांगीण सुंदर वाढत्या भेसळाची
      कानी पडे गाड्यांच्या आक्रोश आवाजाची 
              जय योगा जय योगा


        जय योगा जय योगा
जय हाडांची मूर्ती, आहे नसांची मूर्ती
लक्ष नसते म्हणून आजार बळावतीया
          जय योगा.....


लहानपणी धडा वाचे व्यायाम करा
योगासने करी दुखल्यावरा
डाॅक्टराच्या औषधाने होतो बरा
       तहान लागल्यावर विहीर खोदतीया 
                 जय योगा......


चिंताभर आयुष्यभर रोगांवर बंधना
सरळ टिबी- बीपी- लकवा- वात घटेना
नवीन व्हायरस चा, भर पडे कोरोनाचा  
वेळेवर खावे, शांत झोपावे, नियमित व्यायाम योगा करतीया 
         जय योगा......


        *ॐ जल कोमट नमः*



आपल्या भारतीय योगासनाला जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या *५वा योग दिनानिमित्त* सर्व भारतीयांना हार्दिक सशक्त नी बळकट शुभेच्छा !! 


घरा बाहेर पडू नका
कोरोनाला घरात आणू नका |


        घरात बसून करा योगा 
        सशक्त राहून जीवनाचा आनंद भोगा ||


                 🧘‍♂️ योगीराज
                      देवळेकर गुरुजी
                         ( मुंबई )


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image