पर्यावरणाचा तोल सावरा -- रामदास गायधने

 


निसर्गाने केले बहाल मानवास सारे


परोपकार करुनी सुखाने जगा रे


संदेशही मोलाचा हा दिला


मानवाने निसर्गालाच छेदीला


निसर्गाची शक्ती असे अदभूत


एकवटले सृष्टीत पंचमहाभुत 


मनोहारी, नयनरम्य जे पडे दृष्टीत


सर्व असे निसर्गरुप ईश्वरनिर्मित


मानव मानवातच युध्द छेडीले


मानवतेलाच अाता ठार केले


वनतृण, महावृक्ष कापुन टाकले


सिमेंट काॅंक्रेटचे बन बनवले


सुंदर निसर्गाला केले बकाल


निसर्ग कोपे मग पडे अकाल


कधी होई भुकंप कधी तुफान


निसर्गक्रोध अति होवुनी बेभान


माणसाचे गळुन पडे मग अवसान


उत्कर्ष मानवाचा चकनाचुर होईल


विध्वंसक शस्रअस्र कधीतरी


एकदिवस सारे लयास जाईल


कदाचीत जगही नष्ट होईल


कोरौनासम जीवही मानवानेच निर्मिले


सर्व जगालेच त्याने गिळीले


जरी चंद्रावरही ठेविले पाउल


मंगळालाही कब्जात कधीतरी घेईल


निसर्गाच्या पुढे माणुस तरीही पडतो थिटा


वृक्षसंवर्धन करुनी निसर्गाला जपा


"पर्यावरणाचा तोल सावरा"


मंत्र हाच अाज ठरतो खरा.


 


 


रामदास गायधने


नवीन पनवेल


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image