✒️✒️एक व्यासंगी मुक्त पत्रकार दीपक महाडिक

 


 


धारावी /लोकनिर्माण प्रतिनिधी /दत्ता खंदारे     


    प्रसिद्धी पासून दूर राहून शक्य तेवढी समाज सेवा करणाऱ्यांच्या नावाचा  गवगवा फारसा कुठे होत नसतो परंतु व्यक्तिमत्व कसं असावं याचे उदाहरण दयायचे झाले तर जेष्ठ मुक्त पत्रकार,वृत्तपत्र लेखक दीपक महाडिक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल  प्रत्येक माणसाचा एक पिंड असतो काही माणसे आयुष्य जगताना आपण ही काही समाजाचे देणे घेणे लागतो या भावनेतून समाज कार्य करत असतो समाजात काही घडत आहे याचा डोळस पणे आढावा घेऊन त्यावर उपाय योजना व्हावी असा ध्यास घेऊन वाचा फोडण्याचे काम करत असतो   प्रत्येक माणूस हा समाजाशी संबंधित असे जीवन जगत असतो ज्या व्यक्तीशी आपला रक्ताचा संबंध नसतो तेथे जात पात, धर्म,विरहित नाते पत्रकार जोडत असतात त्याचप्रमाणे समाजात जीवनात  रोजच्या होणाऱ्या घटना मग त्या राजकीय,सामाजीक शैक्षणिक असो वा अन्य कोणत्याही प्रकारच्या घटनांना वाचा फोडण्याचे कार्य दीपक महाडिक करत असतात  कोकण भूमीत नवरत्नाची खाण असलेल्या मंडणगड तालुक्यातील शेवरे  या गावी समान्य गोरगरीब कुटुंबात जन्माला आलेल्या दीपक महाडिक यांनी आपल्या जीवनात काहीतरी करावं म्हणून लेखणीच्या माध्यमातुन  जनतेच्या समस्या  वृत्तपत्रातून मांडून त्या शासन दरबारी  पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यानीं केला तालुक्याचे असो की मुंबई शहराच्या असो  वर्तमान पत्रांतून मांडून वाचा फोडण्याचे प्रयत्न केला दैनिक नवाकाळ,रत्नागिरी गजाली,मुंबई मित्र मधील मुंबईच्या गप्पा, वार्ताहर मध्ये विविध कथा,लेख, खरी वार्ता,आज दिनांक,तसेच नावाजलेल्या सर्व वर्तमान पत्रातून पत्र लेखन,व मुक्त लेख लिहून वाचकांची वाहवा मिळवली  गेली ३० वर्षे एका खासगी कंपनीत काम करून अगदी फावल्या वेळेत अविरहीत त्यानी लिखाण केले  स्वतःचा विचार न करता सदैव दुसऱ्या साठी धडपड करणारा एक व्यासंगी पत्रलेखक, मुक्त पत्रकार,यांची एक वेगळी ख्याती आहे  गेली ३० वर्षे पत्रलेखन, मुक्तपत्रकारीता करत असताना त्यांना रत्नागिरी टाइम्सचे मुंबई संपादक, कै, यशवंतजी पाध्ये साहेब, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक कै, तोडणकर साहेब, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष दत्ताराम दळवी, जेष्ठमुक्त पत्रकार पत्रलेखक दत्ता खंदारे साहेब
 पत्रकार,  शांताराम गुडेकर,  डी,एल कोळंबे, हरिष कावनकर, दिलीप शेडगे,  कवी महेंद्र माने, शिवदास शिरोडकर, शिवाजी फणसेकर,  कोकण दीप चे संपादक दिलीप शेडगे, लोकनिर्माणचे संपादक  बाळकृष्ण कासार, ई टीव्ही चॅनलचे अजयकुमार जाधव ,जेष्ट पत्र लेखक शिरीष बने, ज्ञानेश्वर गावडे, श्रीराम मांडवकर, अशोक हासे, दशरथ गोठल, महेश गोठल, सुरेश शिगवण, सामनाचे देवानंद भुवड,  विजय पवार , किसन डिके व इतर पत्र लेखक मुक्त पत्रकारांचे सहकार्य लाभले वृत्तपत्र लेखक,व मुक्तपत्रकार म्हणून महाडिक गेली ३० वर्षे अविरहीत लिखाण करत आहेत स्वतःचा विचार न करता  सदैवी दुसऱ्यासाठी विचार करणारा व्यासंगी  वृत्तपत्र लेखक,मुक्तपत्रकार म्हणून वेगळी ख्याती आहे समाज कार्य करण्याची आवड सर्वच माणसांना असते असे नाही पण काही निवडक माणसे अशी असतात की त्यांची धडपड दुसऱ्यासाठी असते  ते स्वतःसाठी कधी विचार करत नाहीत. क्रित्येक वर्षे वृत्तपत्र लेखक मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत असताना मुंबई शहरात राहत असणाऱ्या वृत्तपत्र लेखक,मुक्तपत्रकाराना एकत्रित करून मंडणगड दापोली वृत्तपत्र लेखक संघाची स्थापना करून तालुक्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांसाठी आदर्श गाव पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता बरीच वर्षे पत्रातून पत्र लेखन करत असताना आपले स्वतःचे असे मासिक असावे यासाठी सन २००८ साली मंडणगड दापोली नावाचे मासिक प्रकाशित केले. गेली ५ वर्षे मासिकेचे संपादक म्हणून यशस्वीरित्या कामगिरी करून वाचकांची वाहवा मिळवली. परंतु त्यांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने त्यानीं मासिक बंद केले तरी देखील आपली लेखणी चालू ठेवली.



     महाडिक यांनी १९९० साली सर्व प्रथम एका वर्तमानपत्रात पत्र प्रकाशित झाल्यावर  मागे वळून पाहिले नाही मुंबईतील समस्या असो वा गावा कडच्या अगदी तलवारीच्या धारे सारखी लेखणी चालू ठेऊन विविध वर्तमान पत्रांतून पत्रलेखन करत असत गेल्या ३० वर्षात कमीत कमी 2हजारहून अधिक पत्रे व मुक्त लेख प्रकाशित झाली महाडिक यांच्या कार्याची दखल विविध संस्थेने घेऊन त्यांचा गौरव केला.  मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा २ वेळा ज,द सिद्धे पुरस्कार,व१वेळा सर्वोत्तम मुक्त लेखक पुरस्कार मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा  पत्र मित्र, पत्रर्पण, पत्र भूषण ,समाज रक्षक, समाज गौरव, तसेच श्रावण स्मुर्थी मंचचे आदर्श नागरिक सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय कथा लेखन मध्ये प्रथम पुरस्कार, प्रमोद स्मूर्थी मंच तर्फे समाज भूषण महाराष्ट्र पत्रकार संघाचा गुणवंत नागरिक, सुनिर्मल  फाउंडेशन चा सुनिर्मल गौरव पुरस्कार कोकणदीप मासिकेचे कोकणरत्न तसेच श्रमजीवी परिवार तर्फे दापोली येथे समाज भूषण पुरस्कार तसेच इतर संस्थे तर्फे प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आजही अगदी फावल्या वेळेत लेखणीद्वारे विविध विषयांवर लिखाण करत असतात. अशा या निस्वार्थी पत्र लेखक, मुक्त पत्रकार  आज ५२  व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 


महाडिक याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!