भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक

 


चिपळूण/लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)


      मौजे धोपावे ता. गुहागर येथील उद्योजिका सौ.रसिका दळी यांच्या भुमी पॅाटरी व क्ले स्टेशन या उद्योग कारखान्यास रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असतांना भेट दिली. महिलांमार्फत मातीची भांडी बनविण्यासारखा आगळा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय याचा आनंद आहे. समाजमाध्यमांवर याबाबतचा व्हिडीओ बघितला होता तेव्हापासुनच येथे येण्याचा विचार करीत होते. यासारखे पर्यावरण पुरक व प्रदुषण विरहीत असलेले प्रकल्प कोकणाला पर्यटन समृध्द करतील आणि त्यातूनच रोजगार निर्मिती होवून कोकणाचा आर्थिक विकासही होईल. 


       


     या प्रसंगी श्री. राजन दळी, सौ. प्रिती दळी, श्री. अजय बिरवटकर, खादी ग्रामउद्योगचे अधिकारी श्री. राजा आरेकर, सरपंच श्री. सदानंद पवार आदी. मान्यवर उपस्थित होते.


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image