कोकणची दिशा व दशा -- दीपक महाडिक

    कोकण चे नाव ऐकल्यावर कोकण  चे एक सौंदर्य डोळ्यासमोर उभं राहतं मोठमोठी आंबे ,फणस,करवंद काजू,कोकम , नारळी पोफळी ची झाडे   किंजळ  आईनं  तसेच मोठमोठी झाडे झुडपे  घनदाट अरण्य  कौलारू घरे मातीच्या भिंती शेणाने सारवलेले घर अंगणातील तुळस अंगणात खेळत असणारी लहान बालके सकाळच्या प्रहरी ओढ्यावर विहिरीवर, नदीवर पाणी  आणण्यासाठी  जाताना माय भगिनींचा पैंजनाचा आवाज सकाळी पहाटे ४ वाजता कोंबड्या ने दिलेली बांग कोकीळ ताईच सुदंर से गाणे पक्षांचे किलबिलाट सकाळी पहाटे पाठीवर दफ्तर घेऊन शाळेत जाणारा विदयार्थी  माझा शेतकरी दादा खांद्यावर जोखड घेऊन व त्याच्या पाठीमागे टोपलीत घेऊन जाणारी शेतकरी दादाची पत्नी ओसरीवर  बसून हातात अडकित्ता घेऊन सुपारी फोडत असलेले आपले आजी आजोबा  संध्याकाळी जात्यावर दळताना आपली माय  पहिल्या पावसातच कोकणातील लाल मातीला सुटलेला सुगंध पावसाळ्यात नदी,नाले,ओढे ना आलेले पूर उंच डोंगरातुन वाहणारा धबधबा ,आभाळात दिसणारे रंग बिरंगी इंद्र धनुष्य  श्रावण महिन्यात झाडांना फुटलेली हिरवीगार पालवी ,भात, नाचणी,वरी,हरिक यांची डोळणारे हिरवीगार  कणसे , गावाच्या थोड्याच अंतरावर असलेले ग्राम देवतेचे देऊळ  प्रत्येक सणासुदीला देवळात साजरे होणारे ग्राम देवतेचे उत्सव  खास करून फाल्गुन महिन्यात गावो गावातील मिरवणुकी साठी निघालेल्या ग्रामदेवतेच्या पालख्या , भाद्रपद महिन्यातील गावो गावातील घराघरातील  गौरी ,गणपती चा उत्सव  अगदी आनंदाने हे सण कोकणात साजरे होत असत पूर्वी असे होते की  कोकणातील प्रत्येक घरातील एकच व्यक्ती मुबंई शहरात राहत असे  कारण कोकणात कोणतेही उद्योग धंदे नसत कोकणी चाकरमानी मुंबई शहरात आपापल्या गावकीच्या खोलीत राहत असत  शिमगा,गौरी गणपतीच्या सणाला अगदी आवर्जून आपल्या गावी जात असे, पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी एक दोन महिने आपल्या नोकरीवर रजा काढून जात असे त्या वेळेस आपल्या गावी खास करून पत्र व्यवहार करून  चाकरमानी आपली खुशाली कळवत असे  प्रत्येक महिन्याला आपल्या कुटुंबाला मनिऑर्डर द्वारे पैसे पाठवत असे  एखादा व्यक्ती गावी जात असेल त्या सोबत भेट म्हणून आपल्या आई वडील,आजी आजोबा, यांना पान सुपारी, व मुला बाळांसाठी मिठाई असे भेट वस्तु पाठवत असे किती आनंदाचे हे दिवस होते  पोस्टमन ने आपल्या चाकर मान्याचे पत्र हातात दिले की घरची मंडळी किती खुश होत असत कालांतराने दिवसेंदिवस कोकण चे चित्र पालटू लागले कोकणात शेती व्यतिरिक्त कोणतेचेही साधन नसल्याने कोकणी माणूस शेती सोडून मुबंई त वळू लागला कारण वर्ष भर शेतात राबवून जसे पाहिजे तसे पीक शेतात मिळत न्हवते व गावी कोणता रोजगार ही न्हवता कोकणातील राजकारणी मंडळींनी कोकणात उद्योग धंदा आणण्यास कधीच प्रयत्न केला नाही त्या मुळे कोकणचा विकास होत न्हवता गावोगावातील  कोकणी माणूस आपल्या मुलांना शहरात चांगले शिक्षण मिळावे व शहरात जाऊन नोकरी करावी या साठी गावो गावातील कुटुंबे आपली घरे दारे बंद करून शहरात वळली काहींनी आपल्या जमिनी ही विकून शहरात घरे विकत घेतली त्या मुळे गावोच्या गावे ओसाड पडली कोकणातील जमिनी धनदांडग्यानि विकत घेऊन त्या ठिकाणी काजू ,हापूस सारखी झाडे लावून मातब्बर बनली आमचा कोकणी माणूस घर दार सोडून मात्र विरार,वसई,नालासोपारा,कल्याण, डोंबिवली सारख्या शहरात राहून रेल्वेचे धक्के खात मुबंई त नोकरी करू लागला चाकरमानी चे मुले शहरात उच्च शाळेतून,कॉलेज मधून शिक्षण घेऊ लागली हळू हळू चाकरमान्याने आपली गावची मातीची घरे तोडून पक्के घरे बांधली  दिवसेंदिवस दिवस कोकण चे चित्रच बदलून गेले पूर्वीची शेणाची सारवलेली घरे नाहीसे होत चालली ,कोकण चा चाकरमानी फक्त आपल्या गाव देवीचा  शिमग्याचा उत्सव,गौरी गणपतीचा सण  व मे महिन्यातील आपल्या गावच्या सार्वजनिक सत्यनारायण पूजे साठी गावी जाऊ लागला, मुंबईत राहून कोकणी माणूस गाव मात्र विसरला नाही मुबंई त राहून आपल्या गावच्या इतर समस्या सोडविण्या साठी प्रत्येक व आपल्या गावच्या विकासा साठी सर्वांनी एकत्र यावे  यासाठी गावातील मुंबई तील राहणाऱ्या चाकरमानी नी मुंबईत आपले गावचे मंडळ स्थापन करून प्रत्येक सभासद मागे  प्रत्येक महिन्याला वर्गणी काढत असत त्या वर्गणी द्वारे गावातील विविध कामे करत असत ,कोणत्याही निवडणुका असो अगदी ग्राम पंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीत चाकर मानी खास करू मतदानासाठी आवर्जून जात असतो ,कारण आमचा कोकणी माणसाल हेच वाटते जर आपण मतदान केले तरच आपली गावाची कामे होतील त्या साठी मुबंई त राहणारा सर्व मतदार बांधव      मते दयायला आपल्या गावी जात असे. पण कोकणात मात्र जसा पाहिजे तसा विकास झाला नाही. कोकणातील काही खेडे गावी  अशी आहेत की काही गावात अजून रस्ते असून त्या गावात एस टी बस धावत नाहीत  लोकांना तालुक्यात जाण्यासाठी पायपीट करून जावे लागते अनेक  गावे विकासा पासून ही वंचीत राहिली आहेत   कोकणच्या नेते मंडळी,लोक प्रतिनिधींनी जर कोकणातील प्रत्येक तालुक्यात विविध प्रकारचे उद्योग धंदे आणले असते तर कोकणचा माणुस शहरात वळला नसता कोकणचे चित्रच वेगळे पाहायला मिळाले असते तरुणांना रोजगार ही मिळाले असते व आपली शेती ही करता आली असती शेतकऱ्याने आपल्या जमिनी ही विकल्या नसत्या बरे असो काहीही म्हणा आमचा कोकणातील 75 टक्के माणूस शहरात स्थायिक झाला तरी आपल्या गावाला विसरला नाही शहरात राहून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा राहून शहरात काबाड कष्ट करून आपल्या गावाकडचे कच्चे मातीचे घर पक्क्या घरात रूपांतर केले हळूहळू मातीची घरे नाहीशी झाली  वीट, जांभा दगडाची भव्यअशी घरे बांधली    किती आनंदात होता आमचा कोकणी माणूस    पण या आनंदावर  निसर्गाने कोकणी माणसावर   अन्याय केला ती तारीख होती ३जून आदल्या दिवशी सर्व प्रसार माध्यम वर सतत बातम्या झळकत  होत्या चक्री वादळ महाराष्ट्रात येणार  कोकण किनार पट्टीवर याचा परिणाम होणार अशा बातम्या टीव्हीवर येत होत्या पण कोकण वासीयांना असे वाटले न्हवते की निसर्गाचा कोप कोकणावर होईल याच निसर्गाने कोकणावर अन्याय केला चक्री वादळाने कोकणचे नंदनवन हिसकावून लावले आमच्या कोकणी माणसाच्या खास करून रायगड जिल्ह्यातील सर्व खेडेगाव, रत्नागिरी गिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली तालुक्यातील  सर्व गावांना या चक्री वादळाचा फटका बसला क्रित्येक जणांचे घरे च्या घरे  पडली क्रित्येक जणांच्या घरावरील कौले, सीमेंट पत्रे उडून गेले कोणाच्या घरावर झाडे पडली, विजेचे खांब खाली पडले आंबे काजू फणस,नारळ यांची झाडे आडवी पडली  मोबाईल टॉवर तुटून पडले सर्व झाडे झुडपे तुटून नेस्तनाबूत झाली ज्या कोकणी माणसाने घाम गाळून घरे बांधली पोटा पाण्यासाठी आंबे,काजू ची झाडे लावली चक्री वादळाने एका मिनिटातच त्यांची अवस्था बिकट करून आमच्या कोकणी माणसाला रस्त्यावर आणले  एकतर कोरोना मुळे कोकणी माणूस कंटाळलेला होता  गावी रोजगार न्हवता मुंबई शहरातील चाकरमानी मुंबईत कामधंदा नसल्या कारणाने  चक्री वादळाच्या अगोदर नुकताच प्रत्येक व्यक्ती मागे दोन हजार रुपये तिकिट भाडे करून आपल्या परिवार सह गावी गेला होता एक तर सरकारने आपल्या गावी जाण्यासाठी कसलीच सोय केली नाही परप्रांतीयांसाठी सोय केली पण आपल्या महाराष्ट्र तील लोकांना गावी जाण्यासाठी सरकारने कोणतीच उपाय योजना केली नाही.  शहरात राहून  कामधंदा व खाण्या पिण्याची सोय नसल्याने आपला माणूस गावी गेला निदान गावीतरी मीठ भाकरी खाऊन राहू असे मनाशी धरले पण निसर्गाला हे ही पाहावले नाही  चक्री वादळाने कोकणी माणसाला रस्त्यावर आणले वीज पुरवठा खंडीत झाला मोबाईल सेवा बंद पडली  प्रत्येक गावा, गावातील माणसाने आपल्या घरावर कागद,ताडपत्री लावून एक आसरा केला लोक प्रतिनिधी,मुख्यमंत्री विरोधीपक्ष नेते,आमदार,खासदार,खुद्ध पवार साहेब यांनी देखील कोकणची वादळग्रस्त गावांची पहाणी केली चक्क केंद्रीय पथक देखील कोकणात आले  प्रत्येक घराघराचे पंचनामे झाले  नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आज जवळ जवळ  वीस दिवस उलटून गेले तरी क्रित्येक खेडेगावात  नुकसानभरपाई भरपाई मिळाली नसेल असे मला तरी वाटते  सरकारने  लवकरात लवकर आमच्या कोकणी माणसाला  नुकसान भरपाई दिलीच पाहिजे आंबे,काजू यांची नासधूस झाली यांची ही मोठ्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे कारण आंबे,काजू हीच आमच्या कोकण वासीय शेतकऱ्याचे उपजीविकेचे साधन होते वर्ष काठी त्या झाडांवर त्याला चार पैसे मिळायचे   कारण कोकणात बारमाही पीक पिकत नाही फक्त नाचणी आणि भात ही वर्षकाठी पिके होतात  सुद्धा माकडे, डुकरांच्या उपद्रव मुळे पिकांची नासधूस होते वर्षकाठी मेहनत करून देखील त्या शेतीचा काही मोबदला मिळत नाही लिहायला वाईट वाटते  कोकण सोडूनइतर ठिकाणी ठिकाणी असे संकट आले असते तर महाराष्ट्रातील क्रित्येक संस्थेने त्या ठिकाणी धावत जाऊन अर्थिक मदत केली असती पण आमच्या कोकणात पाहिजे तेवढी मदत कार्य झाली नाही  सरकारने आता तरी लवकरात लवकर वादळ ग्रस्त कोकणी बांधवाना नुकसान भरपाई  लवकरात लवकर बँक द्वारे मदत द्यावी. 


  दीपक महाडिक (जेष्ठ मुक्त पत्रकार,विरार पूर्व)