अन्नपूर्णा ची कथा - प्रा विस्मया कुलकर्णी


          वैदेही एका सुसंस्कारीत घरात वाढलेली मुलगी. तिचं बालपण एका छोट्या शहरात गेलं.तिचे आई-बाबा व्यवसायाने शिक्षक असल्याने त्यांचा समाज संपर्क दांडगा होता.दोघेही आपल्या पेशाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असल्यामुळे समाजात त्यांची एक आदर्श प्रतिमा होती. साधी रहाणी ,साध खाणं पण उच्च विचारसरणी हा त्यांच्या घराचा आत्मा होता. वैदेही अभ्यासात हुशार होती. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ती पुण्याला गेली. तिथं तीन एमकॉम पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच एलआयसी ची परीक्षा दिली. तिथे तिला पहिल्या प्रयत्नातच नोकरी मिळाली. तीही पुण्यामध्येच. ती  अर्थार्जन करू लागली. आई-बाबाही तिचं हे यश पाहून आनंदित झाले.आई-बाबांनाही आपली मुलगी मोठी झाली आता तिचा विवाह करणे योग्य आहे असं वाटू लागलं. त्याविषयी ते तिच्याशी अगदी मोकळेपणाने बोलले. ते आधुनिक विचारांचे असल्यामुळे तीन आपला वर शोधला आहे का असं प्रथम त्यांनी तिला विचारलं.या यावर तिचा नकार आला. यानंतर त्यांनी तिच्या भावी नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारलं. आणि वर संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी अनुरुप वधू वर सुचक मंडळामध्ये तिचं नाव नोंदवलं.आई-बाबा दोघेही सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे आणि चांगुलपणावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. पुण्यामध्ये स्थायिक असलेलं एक जोशी आडनावाचे स्थळ त्या मंडळाकडून सुचवलं गेलं. विशाल जोशी असं त्या मुलाचं नाव. पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर.स्वभावाने शांत ,मनमिळावू आणि नवनवीन कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या विशाल पाहताक्षणी तिला हीआवडला. वैदही आणि विशाल दोघेही एकमेकांशी मोकळेपणानं बोलले. आपल्या भावी आयुष्याबद्दल कल्पना आणि अपेक्षा यावरती चर्चा केली. आणि दोघांनाही आपण एकमेकांना अनुरूप आहोत याची खात्री पटली. त्यांनी आपापल्या घरी होकार कळवला आणि लग्नाची पुढची बोलणी सुरू झाली. महिन्याभरातच पुण्यामध्ये अगदी थाटामाटात थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने विवाह सोहळा पार पडला. वैदेही देशपांडे आता वैदेही जोशी झाली. इथपर्यंतच तिचा आयुष्य अगदी एका सरळ रेषेत लं होतं.
         नव्या नवलाईचे ते दिवस. उभयता अगदी आनंदाने आयुष्य अनुभवत होती. दोघेही विशालला मिळालेल्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहत होते. फुलपंखी दिवसांमध्ये वैदेहीला मात्र थोडा ताण येत होता. तिला स्वयंपाक करण्याची फार सवय नव्हती.दहावीनंतर उच्चशिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत असल्याने स्वयंपाक करण्याचा प्रश्नच कधी आला नाही. सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर अगदी जुजबी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न तिने केला होता. पुढे शिक्षण चालू असतानाच नोकरी लागल्यामुळे पैसा हातात आल्यावर बाहेरून डबा घेण् तिने चालू ठेवलं. त्यामुळे गृहिणी म्हणून एक किचन कॉन्फिडन्स लागतो तो तिच्याकडे मुळीच नव्हता. याच्या अगदी उलट नवरा पुण्यामध्ये वाढलेला. शिक्षणाच्या सगळ्या सोयी पुण्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे तो सतत आई बाबां बरोबर होता.त्याची आई गृहिणी आणि तिचे स्पृहणीय यश म्हणजे ती एक उत्तम सुगरण होती. अगदी पारंपरिक पदार्थांपासून आधुनिक पिझ्झा, पास्ता बर्गर पर्यंत तिच्या क्युलीनरी टॅलेंटचा परीघ विस्तारलेला. त्यामुळे विशालच्या पदार्थ विषयक चवीसहित रंग ,गंध, स्पर्श यांच्याशी संबंधित सर्व जाणिवा पराकोटीच्या विकसित झालेल्या . वैदेही मात्र या पटांगणावर अगदीच अनुननभवी खेळाडू होती. तिच्या माहेरी ही सतत चवीचे पदार्थ करत राहण्याची पद्धत नव्हती. सणावारांच्या महत्त्वानुसार उपलब्ध जीनसांमध्ये पारंपरिक रेसिपीज ना फक्त स्थान होतं. त्यामुळे वैदहीनही याला फार महत्त्व दिलं नव्हतं. बाजारात उपलब्ध असलेली रेसिपी बुक्स आणून ती नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असे. विशालच्या आईचीही मदत घेऊन या क्षेत्रातलं तिचं शिक्षण चालू होतं. पण मुळातच फार आवड मात्र तिला नसल्यामुळे सुरुवातीला पदार्थ कसे यथातथाच बनायचे. त्यामुळे नवरा थोडा नाखूश असायचा. तरीही तिने प्रयत्न सोडला नाही. पण यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे याची तिला खात्री पटली.
        त्याच दरम्याने तिला आपण आई होणार आहोत याची चाहूल लागली. तेही एकाच वेळी दोन मुलांची. तिची त्यामुळे हळूहळू घरातलं काम आणि नोकरी करताना ओढाताण होऊ लागली.तिची आई नोकरी करत असल्यामुळे ती सतत तिच्याकडे येऊन राहू शकत नव्हती. आणि विशालच्या बाबांना त्याच्या जुन्या घरातूनच नोकरीला जाण सोयीचे असल्यामुळे ती दोघंही सतत इकडे येऊन राहू शकत नव्हती. शेवटी संसारात आपण इतरांवर जास्त अवलंबून राहू शकत नाही .आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतात हे त्या दोघांनी ओळखलं.
        विशाल चा एक मित्र महिलाश्रम चालवायचा. तिथे एखादी गरजू स्त्री काही काळासाठी उपलब्ध होऊ शकते का अशी चौकशी त्यांन केली. आणि कामसू ,कष्टाळू प्रेमळ सुगरण असणाऱ्या अशा पन्नाशी कडे झुकलेल्या सुलभा मावशी त्यांना मिळाल्या. सुलभा मावशी लगेच तिथं राहायला आल्या.कष्ट करून तयार झालेलं बळकट हाड, मृदू वाणी आणि हाताला चव यामुळे विशाल आणि वैदही यांची मन त्यांनी जिंकून घेतली.
         वैदेहीचे दिवस भरत आले. तेव्हा तिची आई अन सासुबाई दोघीही तिथे राहायला आल्या. तिची डिलिव्हरी झाली .तिने दोन गोंडस बाळांना जन्म दिला. विशाल आणि वैदेहीच्या संसाराची वेल बहरू लागली. त्यांच बारसे आजी-आजोबा, पाहुणेमंडळी यांना निमंत्रित करून मोठ्या थाटात करण्यात आलं. मुलाचं नाव विराज तर मुलीचं नाव विश्वा ठेवलं. सुलभा मावशींच्या मदतीने वैदेही मुलांना वाढवताना आणि नोकरी करताना तारेवरची कसरत करत होती." सुलभा मावशी ,तुमच्यामुळे हे सगळं मला शक्य होतं हो सध्या."असं म्हणून त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करत होती. विशाल आपल्या कौशल्यांवर करिअरमध्ये उंच उंच झेपावत होता. त्याला दर दोन वर्षांनी बढती मिळत होती .चांगला पगार ,अधिक अन्य सवलती त्याला त्याच्या कामाच्या श्रेया मुळे कंपनीत देत होती. यशाचे एव्हरेस्ट गाठण्यासाठी एकेक पायरी तो प्रयत्नपूर्वक चढत होता. पैशाची कमतरता नव्हती. पण विशाल थोडसं अस्वस्थ असायचा. एकदा वैदेही शी बोलताना तो सहज म्हणाला"अगं, यश हे दुधारी शस्त्र अस्त्र बघ."आज मी माझ्या हिमतीवर पुढे जात असताना पहिल्यांदा फक्त प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा चे स्त्रोत असणारे माझे सहकारी आज माझा द्वेष ,मत्सर करू लागले आहेत." सहृदयी विशाल यामुळे अस्वस्थ आहे हे तिने ओळखलं.
        ‌ मुलं हळूहळू मोठी होत होती. त्यांची शाळा सुरू झाली .दोन्ही मुलांकडे नीट लक्ष देऊन नोकरी करणं तिला थोडं जड जाऊ लागलं .विशाल आपल्या करिअरमध्ये व्यस्त होता. सुलभा मावशीचे वयही वाढत होतं. म्हणून वैदेहीने नोकरी सोडायचं ठरवलं.त्यांना वेगवेगळ्या छंदांची ओळख करून देऊ लागली .अभ्यासामध्ये रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांना फिरायला नेणं, शाळेत ने-आण करणे हे सगळं काम ति आनंदाने करायची. मुलांकडे जातीनिशी लक्ष देऊ लागली.
          आता ऑफिसला जाण्याची घाई नव्हती .मुलं शाळेत गेल्यावर तिच्याकडे थोडा वेळ शिल्लक असायचा .त्यामुळे सुलभा मावशी सारखा सुगरणी कडून तीन पाककलेमध्ये प्राविण्य मिळवायचे ठरवलं .शेवटी नवऱ्याला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो ना .युट्युब वर तिला वेगवेगळ्या रेसिपी ची कृती समजू लागली मशीनच्या मदतीने की एक्सपर्ट शेप बनू लागली स्वतःचे काही नावीन्यपूर्ण रेसिपीज बनवून युट्युब ला अपलोड करत होती .तिचा नवरा तिची या क्षेत्रातील प्रगती पाहून एकदम खूष झाला. मुलांनाही रोज चवदार पदार्थ घरच्या घरी ताजे खायला मिळत होते त्यामुळे तेही आनंदी होती . संसाराच्या सुरुवातीला उत्तम पदार्थ बनवता येण्याची तिची उणीव आज तिचं बलस्थान बंनल होतं.अशाप्रकारे 18 19 वर्ष लोटली . मुलं कॉलेजला जाऊ लागली .त्यांची उत्तम शैक्षणिक प्रगती हे वैदेहीच्या कष्टाचे फळ .विराजने सीए करायचं ठरवलं तर विश्वाला इंटिरियर डिझायनर व्हायचं होतं .त्यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुण्यामध्ये उपलब्ध होत्या .मुलांचे शैक्षणिक खर्च वाढत होते आणि नेमके त्याच वेळी विशालच नोकरीतल स्वारस्य संपत चालले होतं .सतत मिळणाऱ्या यशामुळे तो जराही उतू गेला नव्हता पण खूप शत्रू मात्र त्याला लाभले आणि ते त्याला तिथे जीव नकोसा करुन टाकू लागले .त्याला नैराश्य येऊ लागलं .मानसिक ताणाचा परिणाम म्हणून की काय त्याला अवघ्या सेहेचाळिसाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला.सुदैवाने वेळीच योग्य ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्याच्या जीवाचा धोका टळला पण ती नोकरी पुढे चालू ठेवायला तयार नव्हता. शेवटी चार महिने पूर्ण शारीरिक आणि मानसिक विश्रांती घ्यायचं त्यांनी ठरवलं.
      ‌ घरातल् आशादायी वातावरण ,गुणी मुलं ,स्वतः सराव करून सुगरण बनलेली पत्नी ,प्रेमळ सुलभा मावशी ,आई-बाबा ,सासू-सासरे या सगळ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन त्याला या आजारातून सावरायला मदत केली . कठीण प्रसंगात कणखर बनण्याचे सामर्थ्य निसर्गाने स्त्रीला जन्मतः दिलेल आहे. घरातली कमावती व्यक्ती आजारी पडल्यामुळे वैदही ला पैसे मिळवण्यासाठी काहीतरी उद्योग करणं आवश्यक होतं .आणि तिला अचानक एक कल्पना सुचली. तिने ती सुलभा मावशींना बोलून दाखवली. सुलभा मावशींनी ही ती कल्पना आकाराला येण्यासाठी मदत करायचं ठरवलं.सुलभा मावशी अन वैदेही या दोघींनी मिळून विशालला न कळवताच शहरांमध्ये एक छोटसं रेस्टॉरंट सुरू करायचं ठरवलं .वैदेहीने नोकरीतले अन विशालन घरखर्चाला दिलेल्या पैशातील बचत ही भांडवल म्हणून वापरायचं ठरवलं. दोन्ही मुलांनी योग्य जागा भाड्याने मिळवली .आचारी आणि वेटर शोधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रेस्टॉरंटची पुरेशी जाहिरात केली आणि उद्घाटनाच्या दोन दिवस आधी ही सगळी योजना विशालला सांगण्याची जबाबदारी विश्वावर सोपवली.
          विशाल सोफ्यावर पेपर वाचत बसला होता. विश्वा त्याच्यासमोर उद्घाटनाच्  निमंत्रण घेऊनच उभी राहिली. अन्नपूर्णा रेस्टॉरंटच्या उद्घाटनाचा प्रमुख अतिथी म्हणुन तिने त्याला निमंत्रित केलं." विश्वा, व्हॉट ए बिग सरप्राईज !"असं म्हणून त्यांन ते कार्ड वाचलं. एक मिनिट त्याला काय प्रतिसाद द्यावा ते कळेना .तेवढ्यात वैदेहि तिथे आली .तिनं विश्वाच्या मदतीने सगळा प्लान त्याला समजावून सांगितला ..सर्वांच्या अनुमोदनानै विशाल न ती नोकरी काही महिने करावी असं ठरलं. विशाल ह्या गोष्टीला तयार झाला .रेस्टॉरन्टच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला. स्वतः विशाल आणि त्याच्या आईबाबांनी फीत कापून  रेस्टॉरंट्स उद्घाटन केलं
       या गोष्टीला चार महिने लोटले . अगदी सुरुवातीला तिचं कसंब अजमावणारे छोटे-मोठे बरे वाईट प्रसंग आलेही. पण वैदेहीआपल्या कौशल्यावर रेस्टॉरंट चालवत होती. शहरातील खवय्यांचा उत्तम प्रतिसाद तिला मिळत होता. तिथला नफा पाहून वैदहीनं मनाशी निश्चय केला .एका निवांत क्षणी ती विशालला म्हणाली," विशाल ,आता तू नोकरीचा राजीनामा द्यावास आणि मालक म्हणून रेस्टॉरंटच्या कॅश काऊंटर वर बसावस .तुझ्या विविध चवींच्या पदार्थ प्रेमामुळे आकारास आलेल्या या छोट्याशा रेस्टॉरंटचे तुझ्या नवनवीन कल्पनांचा प्राण ओतून फूड चेन मध्ये रूपांतर करावस.म्हणतात ना नवऱ्याच्या जिभेला चव असली की बायको आपोआप सुगरण बनते." विशाल क्षणभर थांबला. आणि म्हणाला ,"केवढ  मोठ आव्हानाच गौरीशंकर आहे!  पण नक्कीच माझ्या सुशिक्षित, सुगरण पत्नीच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच हे आव्हानांचे शिखर सर करीन .असं म्हणून विशालन राजीनामा पत्र लिहायला घेतले.