आषाढी एकादशी आणि वारी माझी .... कवी - प्रदीप पाटील 


नाम घेतं  विठ्ठलाचे 
वारी पोहोचते पंढरी 
बाकी उपवास घरोघरी 
पंचपक्वाण्य  खाऊन करी  .... 


वास जीवात  तरी 
करतात भेटण्या वारी 
भक्ती पाहुनी मानवाची 
पावतो विठ्ठल हरी... 


तो उभा विटेवरी 
पाहून हृदय भरी 
बोध घ्या काहीतरी 
दीनदुखी सेवा अंगिकारी.... 


येतो भेटाया दारी 
कर्म हेचि पंढरी 
नाम मुखी सदा 
चित्त असावं सदाहरीहरी...


देव देव्हारा घरी 
पूजा अर्चना सदाजोकरी 
तीच रोजची वारी 
दर्शन देतो हरी...


----------------------------------------------------------------


वारी माझी.... 


विठ्ठल मज अंतरी 
नाम मुखी सदा 
तीच माझी वारी 
सोबत सदा सर्वदा... 


देव देव्हाऱ्यात पूजा 
रोजच वारीची मजा 
खात्री कर्माने पावशील  
येशील ठोकावत दरवाजा.... 


दिन दुखींना मदत 
हिच करतो  पूजा 
 नसे  कुठं गाजावाजा
 वेडा भक्त  तुझा.... 


रान हिरवं करुनी 
करतो रोजच अन्नपूजा 
घडवला सृष्टी संग 
तूच माझा राजा.... 



सदोदित सोबतीला आहेस 
राबतांना आधार तुझा 
कष्ट पडतात रोज 
शक्ती स्तोत्र तुझा.... 


धावा नित्याच्याच म्हणुनी 
केलंस शेतकरी राजा 
भेटतोस धरणी पंढरीत 
धान्य  पिकवण्यात मजा.... 


जीवाला सुख शांती 
समाधान देतोस तूच 
तुझ्यात मी माझ्यात तूच 
वारी माझी हिच.... 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा जळगाव 
मोबाईल 9922239055©️®️