रायगडा ..-- हेमंत मुसरीफ, पुणे ..

 ..


पहाया  मेघ डंबरी
जावे वाटे रायगडा
जय शिवाजी बोले
तिथे खडा न् खडा


जयघोष शिवबाचा
गढ  आनंदात चढा
पायरी पायरी  गाई
जोशात रे  पोवाडा


राजे जीवंत पुतळा
पाझर फोडे दगडा
वृक्ष वेली सळसळे
वाजे सनई चौघडा


न्यायाधिशां समान  
कटू टक मक कडा
बुरूज किल्ला दावे
पहारा जागृत खडा


सुरक्षा दे  स्वराज्यां
नदी नालेअन्ओढा
असे जाणवे  येईलं
राजेचाउमदा घोडा


करू नका काळजी
विश्वास मिळेतगडा
म्हणुनि वाटते जावे
नीत  जावे रायगडा 


- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996..


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image