*कवी -राष्ट्रपाल भा .सावंत* यांची एक छान कविता *बाप माझा*


होता साधा भोळा
मनाने निर्मळ 
गुणांनी प्रेमळ 
बाप माझा .


वाहिली ती ओझी 
हमाल बनून 
उन्हातान्हातून
रस्त्यावर .


पोटासाठी त्यांनी 
वणवण केली 
लाकडे फोडली 
वखारीत .


पायकीचा गडी 
गुरे सांभाळली 
मजुरीही केली 
गावामधी.


सुख आज दारी 
बाबा नाही घरी 
दुःख हे अंतरी 
सदोदित .
😢🙏🏻🌹🙏🏻


©कवी -राष्ट्रपाल भा .सावंत 
9403144356
"जोडावा माणूस "या काव्यसंग्रह मधील रचना


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image