गुरुवर्य डायटचे प्राचार्य आदरणीय श्री गजानन पाटील यांच्याबद्दल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लिहीलेली कविता


     माझे गुरू माझे गुरू तेचि माझे द्रोणाचार्य
आकाशाहुनी मोठे समुद्राहुनी खोल
माझ्या गुरूंचे माझ्या जीवनात मोठे मोल
लॉकडाऊन काळात विचारात पडला होता खंड
पाटील सरांचे वन मिनिट मोटिव्हेशनल स्पीच होते अखंड
सुंदर विचारांचा निर्माण झाला संग्रह
पाटील सर आपले विचार आम्हास मिळोत अखंड 
ना पडो त्यात कधी खंड
ना पडो त्यात कधी खंड
माझे गुरू माझे गुरू तेचि माझे द्रोणाचार्य


    आपले दोनच शब्द फुलवितात प्रसन्नतेचे कमळ
ताणतणावाचा नकोरे आता मॅटर
  प्रत्येक भेटीत प्रत्येक प्रशिक्षणात होता आमुचे डॉक्टरं
नेतृत्व कसं करावं हेना कळले आयुष्यभर
   आता मात्र नेतृत्वाची सातसूत्री घेऊनी करतोया वाटचाल
पेपराच्या फेरफटक्यातून नेहमीच दाखवता आमच्यावर विश्वास म्हणूनच आमचाही वाढतोया आत्मविश्वास
     शालेय कामात दिसतोया परफॉर्मन्स
     आपले विचार आम्हाला मिळोत अखंड
ना पडो त्यात कधी खंड
माझे गुरू माझे गुरू तेचि माझे द्रोणाचार्य


माझ्या जीवनात माझे दोनच गुरू
एक आई नि एक तुम्ही
तुमच्या प्रेमाची ना होते मोजमाप नि येते कोणास सर
शिक्षकी पेशात आता मात्र नाही ठेवणार कसर
आपले विचार आम्हास मिळोत अखंड
ना पडो त्यात कधी खंड
ना पडो त्यात कधी खंड
माझे गुरू माझे गुरू तेची माझे द्रोणाचार्य
गुरुपौर्णिमेचे देवास एकच मागणे
आपल्यासारखे गुणसंपन्न गुरु
सगळीकडे आयुष्यात लाभणे
आपणास लाभो दिर्घआयुष्य नि निरोगी जीवन
हेच गुरुपौर्णिमेचे देवास हातजोडूनी विणवण
आपले विचार आम्हास मिळोत अखंड
ना पडो त्यात कधी खंड
ना पडो त्यात कधी खंड
माझे गुरू माझे गुरू तेची माझे द्रोणाचार्य


पंडितराव काकासाहेब ढवळे
उपक्रमशील शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंबे नं-१
केंद्र-कुरधुंडा
ता-संगमेश्वर
जि-रत्नागिरी
मो-9421526452/9637941194