८पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा कानपूरमध्ये एनकाऊंटर!

कानपूर/लोकनिर्माण न्युज 


 ८पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेला कानपूरमध्ये घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातामध्ये कार उलटी झाली आणि विकास दुबे जखमी झाला. जीपमध्ये मध्यभागी बसलेला विकासनं पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला यादरम्यान विकास दुबेचा एन्काउंटर करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.