महाराष्ट्र सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांना आर्थिक मदत द्यावी

( दीपक महाडिक यांजकडून)         


लाॅकडाऊन मुळे मुंबई,तसेच उपनगरात  रिक्षा, टॅक्सी चालकांची एवढी उपासमार झाली आहे की त्यांच्या घर कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे  टॅक्सी चालक तसेच  रिक्षाचालक, हे रोजच्या रोज कमविणारे  जेव्हा रिक्षा,टॅक्सी चालवतील तेव्हा कोठे त्याना पैसे मिळतात त्या मिळालेल्या पैशातून आपल्या वाहनाचे हप्ते, घर भाडे घरचा खर्च,मुलांचे शिक्षणाचा खर्च काहीजणांचे घरभाडे इत्यादी आपल्या मिळालेल्या रोजच्या कमाईतून करतात  कधी कधी प्रवासी नसले की धंदा ही होत नाही  ना बँक बॅलन्स ना कोणता व्यवसाय दिवस भर घाम गाळून चार पैसे मिळतात पण मार्च महिन्यापासून लोकडाऊन मुळे बिचाऱ्या टॅक्सी, रिक्षा चालकांची अवस्था एवढी बिकट झाली आहे की अक्षर:शा त्यांना आपले कुटुंब चालविणे ही कठीण झाले आहे वाहन कर्जाचे हप्ते न फेडल्याने  भरमसाठ व्याज वाढत आहे पण सरकारने या रिक्षा, टॅक्सी चालकांचा कधी विचार केला नाही  महाराष्ट्रात सरकारने पुनःच्य हरी ओमची घोषणा केल्यावर या वाहनांना दोन प्रवासी चालविण्यासाठी परवानगी मिळाली  परंतु उद्योग धंदे फारसे चालू नसल्याने प्रवासी मिळत नाहीत विरार नालासोपारा वरून काही टॅक्सी वाहन चालक नोकरीवर जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन तीन एक जणांना घेऊन जात असत परंतु अलीकडेच पोलिसांनी परवानगी नाकारली टॅक्सी,रिक्षा मध्ये अवघे दोनच प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी दिली खरोखर त्या दोन प्रवाशांना टॅक्सी त मुंबईला जाण्यासाठी भाडे परवडेल का तीन एक जण प्रवासी असतील तरच सर्व प्रवाशांना टॅक्सी चालकाला भाडे देण्यास परवडले असते बेस्ट खात्याने बस सेवा चालू केली आहे परंतु बस मध्ये एवढी गर्दी होते की  प्रवासी खूपच खुपच कंटाळून जातात त्यात बस मध्ये बराच वेळ जात असल्याने नोकरीवर ही वेळेवर पोचता येत नाही तरी सरकारने लक्षात घेऊन टॅक्सी ,रिक्षा  चालकांना आर्थिक मदत करावी दिल्ली सरकारने दिल्लीत  मदत केली महाराष्ट्र सरकारने ही तशीच मदत करावी  किंवा टॅक्सी,रिक्षा चालकांना प्रवाशांना तीन चार प्रवासी घेऊन जाण्याची मुभा द्यावी.
 (  दीपक महाडिक)