विठू तुझ्या दर्शनाला... कवी - राष्ट्रपाल सावंत



🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विठू तुझ्या दर्शनाला 
माझे मन आतुरले 
घरी बसलोय तरी 
तुझ्या पंढरीत डोळे .


बघ कसली आपत्ती 
साऱ्या दुनियेत आली 
बंद गावातल्या सीमा 
माझी वाट अडविली .


मी आषाढी कार्तिकीला 
नित्य नियमाने येतो 
मनोभावे आदराने 
तुझी पंढरी पाहतो  .


वाळवंटी नाचूनिया 
दैन्यदुःख विसरतो 
चंद्रभागेत न्हाऊन 
तुझे चरण वंदितो .


ऐक मागणे दुरुन 
ही इडापीडा जावू दे 
तुझ्या पुढच्या वारीला 
मला पंढरी येऊ दे .


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठलाच्या भेटीला पंढरीत जाण्याची ओढ लागलेल्या वारकऱ्यांची मनोकामना 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


©कवी -राष्ट्रपाल भा .सावंत 
9403144356