गुरु पौर्णिमा--- प्रदीप पाटील

 


      गुरुंचा गौरव करणारी...पूजन करण्याची अंनत काळा पासून सुरु असलेली परंपरा...  शिष्य गुरुचे ऋण म्हणून परतफेड दान गुरुदक्षिणा या पौर्णिमेस देत असतो. हा दिवस रामायण महाभारता पासून  ऋषीं,आचार्य,  मुनी, संत, आईवडील यांच्या प्रति आदर.. सद्भावना ठेवून साजरा करणारी परंपरा आहे. काळ बदलत गेला  प्रथम गुरु आई नंतर शैक्षणिक गुरु यांना मान सन्मान म्हणून त्यांनी शिकवलेली कला, ज्ञान जीवनासाठी मार्गदर्शक गुण गुरु देतात..जगावं  कसं हे गुरु शिकवतात. आदर्श गुरु शांती,  सद्भावना, एकता, प्रेम, आदर, संस्कृती, सारं सारं... घरं, देश सृष्टी विषयी व विज्ञान कला   कुटुंब  उदरनिर्वाह कसा करावा यात शिष्यास पारंगत  करत असतात. सत्य कर्म गुरु शिकवत असतात.
       तसं पाहिले तर मानवास जन्म ते मरण या जीवनक्रमात सुरवात ते शेवट पर्यंत अनंत गुरु लाभतात... भेटत असतात. पहिली गुरु आई नंतर ,  वडील, शिक्षक, संत,जीव सृष्टी, आकाश, पृथ्वी, पाताळ, ब्रम्हांड, इतिहास भूगोल, वर्तमान या पासून तो  सतत शिकत असतो.... जे नजरेस पडत असतं जो भेटतो पाहतो चल अचल जीव सारे मानवास शिकवत असतात काहीतरी सांगून जातात आपण शोधक नजर ठेवली त्यांच्या पासून काही शिकलो , शिकत गेलो तर जीवन सार्थक होतं असतं असंच म्हणावं लागेल... त्या साऱ्यांचं ऋण आपणही सतत फेडण्याचा प्रयत्न करावा केला तर आपला जीवनात उत्कर्ष असं मला वाटतं .प्रत्येकाचे काहीतरी आपण देणं लागतो प्रत्येक काहीतरी देऊन ...सांगून जातो... अगदी पशु पक्षी ,जीव निर्जीव यांना  सुद्धा हे वास्तविक भान असलं की पाप मार्ग कमी सुचेल , सुचतील.. पुण्य मार्गी.. माणूस ज्यास हे समजते तो पुण्यमार्ग अवलंबत असतो, सतत कोणाला तरी मदत प्रत्येक जे दिसतं त्यांच्या प्रति आदर.. मला वाटतं हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव मानलेत मानले जातात याचा अर्थ प्रत्येक जीव यास देवगुरु मानलेत.. त्यात पशुपक्षी यांची सुद्धा पूजाअर्चना सांगितली गेलीय . करत असतात ...याचाच अर्थ प्रत्येक जीव मानवास काहीतरी  शिकवण देत असतो असाच तर आहे.
    आजपर्यंत झालेले संत, राष्टपुरुष, राजे महाराजे,  क्रांतिकारी , साहित्यिक, शिक्षक,  वैज्ञानिक, कुटूंबातील आपल्या पासून अगोदर होऊन गेलेले मूळ पुरुष पर्यंत सर्व  गुरूच... होय सारे होऊन गेलेले जीव पण गुरूच आहेत. प्रत्येक काहीतरी सांगून गेलंय... कसं जगलो ...कसं जगावे असंच ... प्रत्येक पात्र गुरूच होय... त्यात आपला ही सूक्ष्म जीव या पुढे गुरु सारखा भासावा असं आपण काहीतरी केलं तर  तीच गुरु प्रति गुरुदक्षिणा असंच माझं मतं ! 
   आज मी लिहायचं म्हणून गुरु कोण कसा याची प्रारूप व्याख्या मांडली. काहीजण म्हणतील याने  गुरुची व्याख्या बदलवून टाकली पण तसं नाही. माझं मतं व्यक्त केलं. त्या मता सोबत आपण सहमत असावं असं नाही प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात.. एक गुरु म्हणून काही चालत असतात... तोच एक गुरु आपणास सारं देतो का तर नाही?  आपण इतरां पासूनही शिकत असतो...आपण  मानत असलेल्या  गुरु सोबत इतरांना ही गुरु मानावे ,  असंच आजच्या गुरु पौर्णिमा निमित्त सांगणं !  गुरु कोण असतो तर सारेच... गुरु  बद्दल ...त्यांच्या प्रति आदर म्हणून लिहलंय... 


      गुरु


कुंभार घडवतो मडकं 
शिल्पकार साकारतो मूर्ती 
गुरु घडवतात समाज 
त्यातून पसरते कीर्ती....


गुरु रूप अनेक 
पहिली  आई एक 
वडील शिक्षक समाज 
सारे  जीवच   गुरु नेक.... 


शिकत असतो जीवनभर 
उसंत नसते कणभर 
तेव्हा संचित मणभर 
त्याचीच उंची काकणभर.... 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
मोबाईल.. 9922239055©️®️
...