चाकरमानी भात लावणी साठी सज्ज                    

                 


(दीपक महाडिक यांज कडून)  


यावर्षी कोरोनाचे संकट असल्या ने सम्पूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्या कारणाने कोकणातील मुंबईतील हजारो चाकरमानी आपल्या गावी गेल्या कारणाने यावर्षी आपल्या शेतात भात लावणी साठी सज्ज झाला आहे यावर्षी त्याना आपल्या शेतात काम करण्यासाठी सुवर्ण संधी आली असून कित्येक चाकरमानी भात लावण्यात मग्न आहेत.  आज कोकणात बऱ्याच वर्षा नंतर चाकरमान्यांना शेतात काम करण्याची संधी मिळाली आहे. तरुण मंडळी देखील या कामात मग्न झाले असून 'गड्या आपला गावच बरा' असे प्रत्येकाला वाटत आहे. 



 कोकणात उद्योगधंदा नसल्याकारणाने कोकणी माणूस आपली शेती सोडून घरदार बंद करून मुंबई सारख्या शहरात वळला कित्येक कोकणी माणसांनी आपल्या जमिनीही विकल्या. फक्त गणपती, शिमगा व मे महिन्याच्या सुट्टीत चाकरमानी जात असे.  पूर्वी असे असायचे काही चाकरमान्यांचे सर्व कुटुंब गावी असायचे.  पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी तो जात असे. हळूहळू चाकरमानी आपल्या कुटुंबाला घेऊन शहरात वळला व शेती सोडून दिली काही मोजकीच मंडळी शेती करू लागली.  पण या वर्षी कोरोना मुळे लाॅकडाऊन असल्याने  व कामधंदा नसल्याने ९० टक्के कोकणी चाकरमान्याने आपल्या गावाकडचा रस्ता धरला  व आपल्या गावातील कुटुंबाबरोबर शेतीचे काम करू लागला.  आज बऱ्यापैकी कोकणी माणसाला कळून चुकले आपल्या जमिनी विकून खूप मोठी चूक केली कारण शेतात काम करण्याची जी मजा आहे ती शहरात मिळत नाही हे त्याने मान्य केलं असणार.  तरुण शिकलेल्या मुलांनाही शेतीचे महत्व काय आहे ते नक्कीच कळले असणार हे मात्र नक्की!