शासनाने  महाराष्ट्रातील सर्व जनतेचे विजेचे बिल माफ करावे ***   दीपक महाडिक

       


       मे महीण्याचे  वीज ग्राहकांना भरमसाठ विजेचे बिल आल्या कारणाने सम्पूर्ण ग्राहकांत संतापाची लाट उसळली आहे प्रत्येक वीज ग्राहक वीज महामंडळाच्या कार्यालयात जाऊन तक्रार   करत आहेत तरी देखील वीज ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही  विरोधी पक्षांनी ही आवाज उठवून देखील ग्राहकांना दिलासा मिळाला नाही  काल   ऊर्जामंत्री  यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की लोक डाऊन च्या काळात  प्रत्येकाने घरात होम वर्क केल्याने व सर्व जण घरातच असल्याने विजेचा वापर सर्वांनी जास्त केला  वा मंत्री  महोदय अहो एखादा मोलमजुरी करणारा कामगार असेल किंवा एखादा खासगी कंपनीत कामगार असेल तर तो घरी काय होमवर्क करणार साहेब रोजनदारीचे काम करणारा कामगार घरी कोणते होम वर्क करणार ठीक आहे एखाद्या व्यक्ती ने आपल्या कार्यालयाचे काम घरी संगणकावर करत असेल तरी सुद्धा एवढे भरमसाठ बिल  येणार का?सामान्य कुटुंबाकडे काय असणार 1 पंखा, फ्रिज,टीव्ही,  याच वस्तू ना ?या भरमसाठ विजेच्या बीलांमुळे जनतेत आक्रोश आहे पगार नाही नोकरी धंदा नाही रोजगार नाही कुटुंबाचे पोट कसे भरावे याची त्याला काळजी आहे आणी एवढी भरमसाठ बीले आल्या कारणाने ग्राहक चिंताग्रस्त झाला असून काही ग्राहकांनी मार्च,एप्रिल  महिण्याचे बिल भरले तरी वाढीव बिले  त्याना देण्यात आली ,जुने युनिट आणी आता मे महिण्याचे   युनिट एकत्रित करून  विजेचे बिल ग्राहकांना  आकारण्यात आले ग्राहकांनी  मार्च एप्रिल,  महिन्याची बिले ऑनलाइन भरून देखील वाढीव बिले दिली गेली. कारण जुने युनिट व आताचे  युनिट एकत्रित करून ग्राहकांना बिल आकारण्यात  आलीत   वीज ग्राहक आपल्या वाढीव विजेचे बिल बाबत तक्रार करण्यासाठी जातात तेव्हा अधिकारी वर्ग त्या ग्राहकाला तुम्ही लोक डाऊन काळात घरी असल्याने  जास्त वीज वापर केलात आम्ही दोन महिन्याचे बिल सरासरीने  दिले त्या मुळे  आता वाढीव बिल  आकारण्यात आले  पण लक्षात घेण्यासारखे एखाद्या वीज ग्राहकाचे मार्च महिन्या अगोदर  प्रत्येक वेळी 100 युनिट पडत असेल तर मार्च ,एप्रिल महिन्याचे 100 युनिट प्रमाणेच बिल दिले ना  मग सरासरी कसे बिल दिले गेले जे ग्राहक पूर्वी जेवढी वीज वापरत होती तेवढीच वीज वापरणार ना  ठीक आहे विजग्राहकांनी   मे महिन्यात उष्णतेमुळे   पंखा 24 तास चालू ठेवला असेल  म्हणून विजेचे युनिट जास्त पडले असेल पण किती दुप्पट,चौपट,युनिट पडणार?वीज ग्राहकांनी आपले  घरभाडे,सर्वप्रकारचे,पॉ लीसी चे हप्ते भरले नाही पण आधी विजेचे बिल भरले जेणे करून वीज कनेक्शन कापू नये   सरकार या लोकडाऊन काळात सर्व सामान्य माणसाची का थट्टा करतेय कळत नाही सर्वसामान्य माणूस गेले साडे तीन महिने घरी आहे सरकारने निदान 1महिन्याचा तरी बिल माफ करायला हवा होता 90 कोटी रुपये परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी खर्च केले जाते मग निदान महाराष्ट्रात 1 महिन्याचे बिल माफ करू शकत नाही का?असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला  पडला आहे   सरकारने स्पष्ट केले की वीज ग्राहकांना 3टप्प्यात बिल भरता येणार  तसेच संपूर्ण बिल भरल्यास 2टक्के सवलत देणार पण 3 टप्प्यात भरताना सर्वसामान्य माणसाकडे पैसे हवेत ना?एकतर दिवसेंदिवस लोक डाऊन वाढत असल्याने लोकांकडे पैसा अडका राहिला नाही शासनाने याचा थोडा तरी विचार करावा  मुख्यमंत्री  साहेब  आपण तरी याबाबतीत लक्ष टाकावे जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे   सरकार आपले आहे असे आपन वेळो वेळी आश्वासन देता ना जशी शेतकरी बांधवांची कर्ज माफी केलीत तशी महाराष्ट्रातील जनतेची ही निदान मे  जून महिन्याचे तरी  सर्व  बिल माफ करावे    जर आपण वीज ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाहीत तर सर्व सामान्य माणसाचे सरकार वरचा विश्वास उडेल हे मात्र नक्कीच.


  (दीपक महाडिक)