✒️सरकारने सर्व सामान्य कार्ड धारकांना ही मोफत धान्य द्यावे  

 


काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अनलाॅक 2  बाबत देशातील सर्व देश बांधवाना  संबोधित करताना देशातील 80 करोड जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत नोव्हेंबर महिन्या पर्यंत प्रत्येक व्यक्ती मागे 5 किलो तांदूळ किंवा गहू व 1 किलो चना डाळ देण्याची घोषणा केली पंतप्रधानाचे अभिनंदन  केंद्र सरकारने घेतलेले निर्णयाचे देशातील सर्व गोरगरीब जनतेने स्वागत केले आहे  मोदी सरकारचे अभिनंदन   पण केंद्र सरकारने देशातील 130 कोटी जनतेपैकी 50कोटी जनतेला सरकार कोणतीही योजना आणत नाहीत याचे आश्चर्य  वाटते  50 कोटी जनतेपैकी सर्वच लोक श्रीमंत नाहीत    खऱ्या अर्थाने 60हजार ते 1लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या रेशन कार्ड धारकांना ही सरकारने या योजनेत समाविष्ट करणे गरजेचे होते  कारण अशी कार्ड धारक ही गरीब आहेत  2014 साली मोदी सरकार सत्तेवर येण्या पूर्वी 1लाख हुन कमी असलेल्या सर्वच रेशन कार्ड धारकांना  सर सकट सर्वाना 10 रुपये किलो दराने धान्य मिळत असे परंतु  मोदी सरकार सत्तेवर आल्यावर  फक्त 60हजारहून कमी असलेल्या रेशन कार्ड धारकांना 2 रुपये व 3 रुपये किलो दराने धान्य देण्याची योजना आणली व 60हजार हुन अधिक उत्पन्न असलेल्या कार्ड धारकांना कोणतीही योजना आणली नाही कोरोना मुळे सर्व जनतेची अवस्था बिकट झाली कोणालाही रोजगार नाही उद्योग धंदे बंद पडल्याने लाखो कामगार बेकार आहेत. अगदी खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची अशी अवस्था आहे की त्यांना दोन वेळचे जेवण ही मिळत नसेल  सरकारने याचा विचार करायला पाहिजे  धनी मालकाने कामगाराला एक दोन महिन्याचा पगार दिला असेल पण धनी मालकाचा धंदाच बंद आहे तर  कामगाराला पगार कसा मिळेल
 केंद्र सरकारने 60 हजारहून ते 1लाख उत्पन्न असलेल्या रेशनकार्ड धारकांना निदान प्रत्येक व्यक्ती मागे दोन ते तीन किलो  तरी मोफत धान्य देणे गरजेचे होते कारण कोरोना मुळे या तीन महिन्याच्या  लोक डाऊनकाळात  सर्वांची घरची परिस्थिती बिकट आहे   कोण कसे जीवन जगतोय   ते त्यानाच माहित  राज्य सरकारने  60हजारहून अधिक उत्पन्न असलेल्या रेशन कार्ड धारकांना प्रत्येक व्यक्तिमागे 8 रुपये 12 रुपये किलो दराने  दोन किलो गहू व 3 किलो तांदूळएप्रिल ते जून महिन्यापर्यंत धान्य देण्याचे घोषित केले एक महिन्याचे धान्य कार्ड धारकांना मिळाले पण मे, जून महिन्याचे धान्य अजूनही काही ठिकाणी मिळाले नाही   मग अशा कुटुंबांनी पोट भरावे तरी कसे  रोजगार नाही धंदा  नाही   दुकानातून महागडे धान्य आणणार तरी कसे  निदान विरोधी पक्षांनी तरी केंद्र सरकार कडे सर्वानाच धान्य देण्याची सोय करावी अशी मागणी करायला पाहिजे निवड णुकीत मात्र सर्वांकडून मते हवी असतात मग सर्वांसाठी सरकारने  सोय उपलब्ध केली पाहिजे असे मला तरी वाटते मोदी सरकारने अर्थात केंद्र सरकारने निदान आतातरी  60 हजारहून अधिक असलेल्या रेशन कार्ड धारकांना लाॅकडाऊन काळात मोफत धान्य देण्याची घोषणा करावी व करणे गरजेचे आहे कारण दिवसेंदिवस कोरोनाचा प्रदुभाव वा ढत असल्याने लोक डाऊन वाढतच जाते  त्या मुळे  जनतेची अवस्था दिवसेंदिवस बिकटच  झाली आहे  केंद्र सरकारने आतातरी लक्ष घालून  सर्वसामान्य अर्थात  एक लाखाच्या आत असलेल्या कार्ड धारकांना ही मोफत धान्य देण्याची घोषणा केली पाहिजे राज्य सरकारने ही केंद्रा कडे अशी मागणी केली पाहीजे.


✒️✒️        दीपक महाडिक