मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)
भायंदर येथे राहणाऱ्या श्रीमती संजू राठी या जगप्रसिद्ध अक्षर सुलेखनकार , हस्ताक्षर तज्ञ ( हॅंडरायटिंग एक्सपर्ट) आहेत. गेल्या १० वर्षांपासून संपुर्ण देशात आणि परदेशात अक्षर सुलेखन , हस्ताक्षर प्रशिक्षण देण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहेत . त्यांचा हा महत्त्वाचा कोर्स " एकांसा हॅंडरायटिंग परफेक्शन कोर्स " या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे , या कोर्सच्या अंतर्गत ३०० पेक्षा जास्त महिला काम करीत आहेत.तसेच त्यांनी आता पर्यंत ४०००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्षर सुलेखनाचे , हस्ताक्षर (हॅंडरायटिंग) प्रशिक्षण दिले आहे. यात १००% हमी ( गॅरंटी ) सहीत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या कोर्स मुळे फक्त अक्षर सुलेखन , (रायटिंग ) हस्ताक्षर , लिखाणच नव्हे तर व्यक्तिमत्वातही खूप बदल होतो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. सध्याच्या कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील मोठ्या संकट काळात संजू राठी यांनी हजारो विद्यार्थ्यांना अक्षर सुलेखनाचे , हस्ताक्षर , आणि शुध्द लेखनाचे ऑनलाइन प्रशिक्षण देऊन त्यांच्या लिखाणात सुधारणा केली आहे . तसेच १०० च्या पेक्षा जास्त अक्षर सुलेखन हस्ताक्षर प्रशिक्षण शिबीरे आयोजित करून नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी जनजागृती करण्यासाठी अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
या प्रशिक्षण शिबीरात हस्ताक्षर कसे असावे आणि लिखाणामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर कोणता प्रभाव पड़तो आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वांना एकदम विनामूल्य मार्गदर्शन केले आहे.विशेषत: त्या विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे देण्यासाठीही काम करतात. संजू राठी एकांसा सोशल फाउंडेशन या नावाने एक सामाजिक संस्थाही (एनजीओ) चालवतात . त्या संस्थेच्या वतीने दरवर्षी ७० विद्यार्थ्यांना एक वर्ष विनामूल्य सुंदर हस्ताक्षर , शुध्द लेखनाचे प्रशिक्षण दिले जाते. या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात काही शिक्षकही त्यांना मदत करतात. तसेच मीरा -भायंदर मधील समाजसेविका दीपा सूर यांच्या हेल्पिंग टीमचे कार्यकर्तेही त्यांना सहकार्य करतात. कोरोना योध्दा संजू राठी यांच्या या महान शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला मानाचा मुजरा !मुंबई