श्रावण बहरला - (कविता)

                 


आषाढ ओसरला
श्रावण बहरला
गात मेघमल्हार
घन निळा बरसला


सृष्टी सौंदर्याला
क्षणात भुलला
रिमझिम बरसत
धरतीच्या मिठीत विसावला


हिरवा शालू लेवूनि
नटली वसुंधरा
वृक्ष-वेलीतून
श्रावण निथळला


इंद्रधनूच्या सप्तरंगात
बेधुंद नाचला
गंध मातीचा दरवळला
श्रावण गाली हसला


लक्ष्मण राजे
इ/४०४ , होली काॅम्पलेक्स
मीरा भाईंदर रोड
मीरा रोड पूर्व
मो. ९८२१८३३०२५