चिपळूण बाजारपेठ बंद करणेबाबत न करणेबाबत होणारी उलटसुलट चर्चा - शिरिष काटकर ( पत्रलेखन)

   
सध्या चिपळूण बाजारपेठ बंद होणार का? वगैरे चर्चा सुरु आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे..मी स्वत:  पुढाकार घेऊन ०७—०९ रोजी काही संघटनांशी चर्चा केली होती.  ०८—१० दिवस बाजारपेठ बंद ठेवणेबाबत...पितृपक्ष असलेमूळे  बाजारपेठेत व्यवसायबंधूचा धंदाही होत नव्हता.दहा दिवस बंद पाळून कोरोनाची चेन तोडता येणार होती तसेच मंदी ( पितृपक्ष ) असलेमुळे व्यवसायबंधूचे नुकसानही होणार नव्हते.समतोल राखला गेला असता.परंतु त्याचवेळी मोठ्या व्यापारी यांचा विरोध आहे असे  मोठ्या संघटनेकडुन सांगीतले गेले.( त्यांची नावही सांगीतली होती.) आणि त्यामुळे पितृपक्षातील बंद प्रयत्न करुनही बारगळला....आता बाजारात अनेक छोटे व्यापारी आहेत त्यात अनेकांचे रोज कमवल्यावर घरदार चालते.सलून व्यावसाईक,रिक्षा व्यावसाईक,रस्त्यावर काम करणारा मजूर,पानपट्टीधारक असे अनेक छोटेमोठे व्यावसाईक आहेत..त्या सर्वांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.तेव्हा काल अशा सर्व व्यवसायबंधूनी एकञ येऊन सध्या बाजारपेठ बंद नको शासन ज्यावेळी बंद करेल तेव्हा प्रामाणिकपणे बंद पाळू असा निर्णय घेतला आहे...शासनाने सगळीकडे लाॅकडाऊन उठवण्पाची पाऊले उचललेली आहेत.रेल्वे,एसटी सूरु केलेले आहेत..भविष्यात कोरोना किती वर्ष राहील याचा कुणालाही अंदाज नाही त्यामुळे लाॅकडाऊन हा आता पर्याय नाही असं वाटतं..मार्चपासून तीन साडेतीन महिने लाॅकडाऊन मध्ये छोटेमोठे व्यापारी अक्षरश: पिळवटून निघाले आहेत परंतु ज्यांनी संपुर्ण लाॅकडाऊनमध्ये मागील सहा महिन्यात  मोजून ६ दिवस बंद पाळला ते लोक माञ आता बंद करणेसाठी पुढाकार घेत आहेत हे न उलघडणारे कोडे आहे.तरीही बाजारपेठेची परिस्थिती भविष्यात बिघडत आहे अशी सर्व छोटेमोठे व्यवसायबंधूची मानसिकता झाली तर बंदबाबत पूढेमागे चर्चा करता येईल..शासनाच्या धोरणानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्यानुसार सर्व व्यवसायबंधू वागतील आणि आपली,कामगारांची आणि ग्राहकांची काळजी घेतील हा विश्वास आहे. 


        शिरिष काटकर


              चिपळूण