रसायनीत शेकापला मोठा धक्का

 


पनवेल/लोकनिर्माण(प्रतिनिधी)


      भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर  प्रभावीत होऊन रसायनी विभागातील शेकापचे युवा नेते सतिश लक्ष्मण ठाकूर, अतिष लक्ष्मण ठाकूर, नितीश लक्ष्मण ठाकूर तसेच रोहित यशवंत पाठारे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
     पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवेश देण्यात आला. डॉ.अविनाश गाताडे व प्रतिक भोईर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला.  या पक्षप्रवेश कार्यक्रमाला नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ.अविनाश गाताडे, संतोष माळी, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मिरकुटे, विभागीय अध्यक्ष प्रविण खंडागळे, सुनिल माळी, तुराडे ग्रामपंचयतीचे उपसरपंच हरिष पाठारे, जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष प्रतिक भोईर, प्रफुल्ल पाठारे, 
योगेश मुरकुटे, प्रीतेश गायकर, देवेंद्र भोईर, भावेश रसाळ, आदी उपस्थित होते.


     
    सतिश, अतिष व नितीश हे पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती निशा ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रश्नाकडे शेकापच्या नेत्यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी शेकापच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला. या मतलबी कारभाराला कार्यकर्ते पुरते कंटाळले आहेत. त्यामुळे शेकापला मोठ्या प्रमाणात घरघर लागली आहे. या प्रवेशामुळे रसायनी विभागात शेकापला मोठा धक्का बसला आहे.