उपेक्षित वंचित घटकांचें लढाऊ नेतृत्व शैलेंद्र पी.नागरे पाटील

 


मुंबई/लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे )


     


      उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील जनहितार्थ प्रश्न सरकार दरबारी कार्य तत्परतेने मांडणारे एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणजे श्री.शैलेंद्र.पी. नागरे ! पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई सेंट्रल पूर्वेकडील कामाठीपुरा सुखलाजी स्ट्रीस्ट या बकाल भागातून लहानाचे मोठे झालेले निवासी कार्यकर्ते आहेत. तसेच काॅंग्रेसचे तत्कालीन नगरसेवक ब्रम्हचारी पांडे यांच्या सोबत सदैव सामाजिक, राजकारणात सक्रिय जनसेवक म्हणुन त्यांची ओळख आहे. त्याकाळात ते उच्च नेतृत्वापर्यंत पोहचू शकले नाहीत , पण त्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका ई वार्डात जनसेवक अशी ओळख आहे. शैलेंद्र नागरे पाटील प्रत्येक चळवळीचे प्रणेते, उपेक्षित वंचित घटकांसाठी, समाजासाठी ,तर इतर मागासवर्गीय कल्याणकारी योजना शासनाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबवण्यासाठी नाशिक जिल्हा सिन्नर आणि इतर तालुक्यातील ग्रामीण भागात पातळीवर जाऊन कार्य करीत आहेत . ते आपलं तन, मन, धन, अर्पण करून चंदना सारखे झिजत आहेत.


      भारतीय राजकारणात अनेक युवक ग्रामीण भागातून बृहन्मुंबई सारख्या शहरात येऊन मोठे नेते झालेले पाहिले असतील , पण बृहन्मुंबई या महानगरातून जिल्हा, तालुका , ग्रामीण भागातील गरीब वंचित लोकांच्या जीवनात एकरूप झालेले असे नेते दुर्मिळच असतात. शैलेंद्र.पी. नागरे पाटील आपल्या गावाला विसरले नाहीत. गावची माती मस्तकी लाऊन आपले पूज्य पिताश्री स्व.पांडुरंग नागरे पाटील आणि पूज्य मातोश्री रूक्मिणी देवी यांच्या शुभ आशिर्वादाने  सामाजिक कार्यात सदैव जोमाने वाटचाल करीत आहेत. त्यांनी स्वत:ला सार्वजनिक जीवनात समर्पित केले आहे.सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ते समाज कार्य करीत आहेत.


    दिनदुबळ्याला आधार देण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांच्या पत्नी श्वेता जी  या सुरूवाती पासूनच त्यांना समाजकार्यात अगदी सावली सारखी साथ देत आहेत. तसेच या सामाजिक कार्यात सुपुत्र कु.हर्षवर्धन आणि कु.कार्तिक राज यांची साथ सोबत आणि मदत त्यांना नेहमी होत असते.शैलेंद्र नागरे पाटील यांनी मागील वीस वर्षांपासून सरकारी आणि खासगी व्यवसायिक उद्योजक यांच्यात समतोल पणे पुलाची भूमिका तल्लखपणे पार पाडली आहे. तसेच अजूनही त्यांची प्रामाणिकपणे वाटचाल सुरू आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्यांना शारीरिक अडचणींना देखील सामोरे जावे लागले. तरीही ते पूर्वीसारखे उत्साही जोमदार पणे सामाजिक कार्यात त्यांचे मार्गदर्शक जेष्ठ नेत्यांच्या भक्कम आशिर्वादाने आणि सदैव पाठीशी असणाऱ्या मार्गदर्शकांच्या आणि साथीदारांच्या पाठींब्याने ते त्यांच्या सामाजिक कार्यात पूर्णतः गुंतलेले आहेत.भटक्या जमाती ड या प्रवर्गातील वंजारी समाजाला आपलंस करून श्रध्दास्थान मानलेल्या आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक स्तुत्य उपक्रमातून त्यांनी विविध समाजोपयोगी  शिबीर आयोजित करून समाजाला  दिलासा देणारी काम केली आहेत .त्यांची राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यशस्वी पणे दमदार वाटचाल अविरतपणे सतत सुरू राहणार आहे यात मुळीच शंका नाही.