कोळगाव येथील अपंग माजी सैनिक संपत शिरसाठ यांचे आमरण उपोषण ...प्रहार संघटना व त्रिदल सैनिक सेवा संघाच्या दणक्या मुळे  श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील उपोषण यशस्वी.

पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)


      श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथिल माजी अपंग सैनिक संपत शिरसाट यांनी कोळगाव ग्रामपंचायतीच्या आनागोंदी कारभाराला तसेच विविध विकासकामांचा निकृष्ट दर्जा तथा निधी अपहार मुळे  उपोषण सुरू केले होते. अनेक निवदने देऊन देखिल ग्रामपंचायत मधे झालेल्या भ्रष्टाचारा बाबत ग्रामपंचायत व वरिष्ठ आधिकारी यांनी डोळेझाक करित कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. अखेर या कारभाराला वैतागुन अपंग माजी सैनिक संपत शिरसाट यांनी उपोषण सुरू केले.  प्रहार संघटना व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी या उपोषणास पाठींबा दिला.  प्रहार संघटना नगर जिल्हा अध्यक्ष विनोद परदेशी व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप लगड यांनी उपोषणस्थळी स्वतः हजर राहुन प्रशासनास तिव्र आंदोलनाचा ईशारा देताच प्रशासनास जाग आली व संबधीत अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व कामांची SQM मार्फत चौकशी करून दोषींवर २० दिवसात कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली.


         


       यावेळी प्रहारचे अध्यक्ष श्री बधे, त्रिदलचे शिवाजी कुडांडे, श्री अजय देशमुख, श्री भाऊसाहेब जाधव. व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी सुद्धा चोक बंदोबस्त ठेवला होता.