स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला ठेवीदारांचा प्रचंड प्रतिसाद - अॅड दीपक पटवर्धन

 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)


स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहे. आज पर्यंत १ कोटी ७५ लाखांच्या नवीन ठेवी जमा झाल्या असून सर्व शाखांकडे ठेवीदारांचा वाढता प्रतिसाद अनुभवतांना खूप सुखावह वाटत आहे. संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा हे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे शक्तीस्थान आहे. याची प्रचिती येत आहे असे अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.
       स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची कर्जे १४३ कोटी पल्याड गेली असून वसुली ९८.७७% असून बँकेमध्ये केलेली गुंतवणूक १०४ कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी २६ कोटी ८६ लाख झाला असून खेळते भांडवल २५३ कोटी ६७ लाख झाले आहे. कोव्हीड या कठीण कालखंडातही संस्थेने उत्तम आर्थिक नियोजन करून आपले व्यवहार वृद्धिंगत ठेवले आहेत. स्वागत ठेव योजनेतील योजनांचा लाभ गुंतवणूकदारांनी घेण्यासाठी सोहम ठेव योजनेत ७.१०% दराचा तर स्वरूपांजली योजनेत ७% या आकर्षक दराचा लाभ घेऊन निश्चिंत होण्यासाठी गुंतवणूक करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.