खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन

 

चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधीतालुक्यातील खेर्डी भुरणवाडी येथील रहिवासी आत्माराम रामजी भुरण यांचे गुरुवार दिनांक  २८/१२/२०२३ रोजी रात्री ९ वाजता मुंबई येथील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. 

    आत्माराम भुरण हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते सामाजिक क्षेत्रात हिरेरिने भाग घेत असत. ते भुरणवाडी येथील मुरलीधर मंदिराचे पुजारी होते.

    त्यांच्या निधनाची वार्ता समजताच खेर्डी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या अंत्ययात्रेला चिपळूण, मुंबई येथून त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

   त्यांचे दशविधी शनिवार दिनांक ६/१/२०२४ रोजी खेर्डी स्मशानभूमीत होणार असून उत्तर कार्य सोमवार दिनांक ८/१/२०२४ रोजी चिपळूण, भुरणवाडी येथील राहत्या घरी होणार आहे.