ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात  तीन बोगस डॉक्टर सापडल्याने खळबळ

ठाणे/लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)

      ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालय आहे जे रुग्णालय याआधी दोन वेळा प्रशासनाच्या गाफीलतेसाठी प्रकाश झोतात आले होते. आता थेट प्रशिक्षण नसलेले डॉक्टर या रुग्णालयात आढळल्याने इथे उपचार घेऊन गेलेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या जीविताशी प्रशासनाने दगा केल्याची भावना व्यक्त होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर, अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.