पाच अनाथ गरजू मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन मनसेचे अमोल मोरे यांचा अनोखा उपक्रम

             


खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


      महाराष्ट्र नवनिर्माणविध्यार्थी सेनेचे शहर संघटक श्री अमोल मोरे यांना काल श्री अंबेभवानी देवी मातेच्या पूजेचा सपत्नीक मान मिळाला होता या निमित्ताने ५ अनाथ गरजू मुलींना त्यानी शिक्षणासाठी दत्तक घेतले. कोणतीही नवदूर्गा आपल्या परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या ऊदात्त हेतूने त्यानी ह्या ५ ही मुलींचे कुमारी पूजन करून  त्यांचा सुपुत्र अयान मोरे याच्या हस्ते आर्थिक मदत सुपूर्द केली.यावेळी अमोल मोरे, अंजली मोरे, शैलेश धारिया, राजू आंब्रे, सुरेश खेडेकर, शंकर पार्टे, वेदांत चिखले व इतर मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या ह्या अनोख्या उपक्रमाचे खेडचे नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर यांनी विशेष कौतुक केले.