कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार

 


मुंबई /लोकनिर्माण न्युज 

   कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या अधिक वेगवान होणार आहेत.कमी भारमान तसेच तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देशभरातील १८ रेल्वे झोनकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार ज्या पॅसेंजर गाड्यांना मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे, त्यात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या रत्नागिरी - मडगाव (50101), मडगाव - रत्नागिरी (50102), दिवा - सावंतवाडी (50105) सावंतवाडी - दिवा (50106) या गाड्यांचा समावेश आहे.


Popular posts
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image