नेरुळ येथे लटकत असलेल्या डी.पी. वायरी भूमीगत करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महावितरण अधिकारी यांना दिले निवेदन

 


नवी मुंबई /लोकनिर्माण 


      नेरुळ , नवी मुंबई येथील डी.पी. बाहेरील लटकणाऱ्या वायरी भूमीगत करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर व महावितरण अभियांता आण्णा साहेब काळे यांना विंनती पत्र दिले आहे.


       


      नेरुळ, नवी मुंबई सेक्टर -२०, गांवदेवी मंदिरा समोरील  सध्यास्थितीत विद्युत डि.पी. च्या बाहेर चालू विद्युत वायरी लटकत असलेल्या पडल्या आहेत. त्या ठिकाणाहून लोकांची वर्दळ असते. रस्त्यावरुण लोक ये जा करत असतात, दरम्यान लहान मुले देखिल या ठिकाणी खेळत असतात. जर या अश्या विद्युत चालु वाहत असलेल्या वायरीला कोणाचा स्पर्श झाला तर भविष्यात पुढे खुप मोठी दुर्घटना होण्याची संभवना नाकारता येत नाही. तसेच, या गोष्टीचे गांभीर्य लवकरात लवकर लक्षात घेता सदर डी.पी. बाहेरील लटकणाऱ्या विद्युत चालु  वायरी भूमीगत कराव्या अशी विनंती महापालिका आणि नवी मुंबई विद्युत केंद्राकडे करण्यात आली आहे.