आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज केलं जाहीर

                   
मुंंबई/लोकनिर्माण न्युज
      अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. दिवळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हटलं आहे. फळपीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार. रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिरायत आणि बागायत नुकसानग्रस्तांसाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या हक्काचे ३८ हजार कोटी केंद्राकडे प्रलंबित आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंअद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपय प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image