मुंबईत राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न 


कल्याण / लोकनिर्माण न्यूज (सौ.राजश्री फुलपागर)
      मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यलयात
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार  शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  यांच्या उपस्थितीत पार पडली. विभागातील महिला अत्याचार रोखण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी  काय उपाययोजना करता येतील, पक्ष संघटना कशाप्रकारे बळकट करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे,  नवी  मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, नगरसेवक चंद्रकांत पाटील उपस्थित होते.