नाट्यपरिषदेचा खोटारडापणा होणार उघड, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने पाठपुरावा करून मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा करू लागले केविलवाना प्रयत्न


मुंंबई /लोकनिर्माण (गणेश तळेकर )


                   
      ५९ व्या महाराष्ट्र हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक, आणि अंतिम स्पर्धेत सहभागी झालेल्या ४४५ नाट्य संस्थांना शासनाकडून अनुदान, निवास, प्रवास भत्ता, बक्षिसाची रक्कम, नाट्यगृह भाडे, तांत्रिक साहित्य भाडे आदी रक्कम शासनाकडून देण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान केले असून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होतांना दिसत आहे हे प्रकार त्यांनी ताबडतोब थांबवावे अशी समज प्रदेश राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. 


     राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग या प्रश्नांचा गेल्या ६ महिन्यापासून पाठपुरावा करत असून विभागाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम या प्रश्नाचा मंत्रालय पातळीवर आगदी रोज पाठपुरावा करत आहेत*. हे मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील तथा वित्त विभागातील अधिकारी सुद्धा सांगतील.
       ९ सप्टेबर रोजी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रदेशकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य समन्वयक संतोष साखरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, उपाध्यक्ष विजय पाटकर, कौस्तुभ सावरकर, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, प्रियदर्शन जाधव माया जाधव, शाम राऊत आदीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा , संसद रत्न खासदार मा. सुप्रियाताई यांची भेट घेवून या विषयी त्यांना निवेदन देवून हौशी कलावंतांची हि अडचण विषद केली होती*. त्यावर अजित दादा यांच्या वतीने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि शासकीय पातळीवर या प्रश्नाला वेग आला. शिष्टमंडळाच्या वतीने डॉ. सुधीर निकम, संतोष साखरे यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्या प्रमाणे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब, त्यांचे स्वीय सहाय्यक जावळे साहेब, राज्यनाट्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी असणारे सांस्कृतिक संचालक चौरे साहेब, इतकेच नाही तर वित्त विभागाचे सचिव बाजीराव पाटील साहेब यांच्या सर्वांशी वेळोवेळी भ्रमणध्वनीवर सकाळ संध्याकाळ पाठपुरावा सुरु केला.
        संतोष साखरे यांनी  पुण्यात अजित दादा यांची भेट घेवून पुन्हा या प्रश्नासाठी दादांना मागणीचे स्मरणपत्र दिले सांस्कृतिक विभागातून वित्त खात्यात सदर फाईल आल्याचे समजताच आणि दादांनी तातडीने ती फाईल मागवून घेण्याचे आदेश दिले. 
     आता काही दिवसात महाराष्ट्राच्या हौशी नाट्य संस्थांना त्यांच्या खात्यात त्यांची अनुदान रक्कम शासनाच्या वतीने दिली जाणार हे नक्की. मात्र नाट्यपरिषदे ने *हे श्रेय स्वतःच्या नावे लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला असल्याचे उघड झाले आहे. काय तर म्हणे ४४५ नाट्य संस्थाच्या खात्यात ६ हजार रुपये प्रमाणे रक्कम टाकणार..! नाट्यपरिषदेकडे मदत करायला रक्कम नाही हे तेच सगळ्या जगाला सांगत होते*., होती तर पडद्यामागील कलावंतांना का मदत केली नाही. कोविड काळात कलावंतांना जी मदत केली होती त्यातील बहुतांशी रक्कम सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या वेल्फेअर फंडातून दिली गेली होती हे न कळण्याइतके कलावंत खुळे राहिलेले नाहीत. एक कोटी २० लाख रुपयाच्या निधीतून कोणाला मदत केली नाट्यपरिषद त्यांच्याच संचालकांना सांगायला तयार नाहीत. मग खिश्यात नाही दाणा अन बाजीराव म्हणा सारखी गत असतांना चक्क ४४५ संस्थांना हे कशी काय मदत करणार असा प्रश्न कलावंतांच्या वतीने विचारण्यात येत आहे. नाट्यसंस्थांच्या खात्यात काही दिवसात सांस्कृतिक संचालनालयाचे जमा होणारे पैसे आम्ही दिलेले आहेत असा अपप्रचार उद्या कलावंतांच्यात करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषद करत आहे. हे त्यांनी तत्काळ थांबवावे असा इशारा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image