शहर विकासाला खोड घालणाऱ्यांनी आणि एक रुपया देखील शहराच्या विकासाला न देणाऱ्या आमदार योगेश कदम यांनी आम्हाला सल्ले देऊ नये - वॆभव खेडेकर

           


खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
     खेडचे कोव्हीड केयर सेंटर हे उशिरा सुचलेले शहाणपण नसून आपण जेव्हा सुरवातीला दोन महिने घरात कोरोनटाईन होतात तेव्हा पासून सुचलेले शहाणपण आहे,  खेड नगरपालिकेचे कोव्हीड केयर सेंटर हा इतर कोणाचा हट्ट नसून माझा च हट्ट आहे. शहर विकासाला खोड घालणाऱ्यांनी आणि एक रुपया देखील शहराच्या विकासाला न देणाऱ्या आमदार योगेश कदम यांनी आम्हाला सल्ले देऊ नये काय करावं आणि काय नाही यासाठी आम्ही समर्थ आहोत असा प्रतिहल्ला मनसेचे राज्य सरचिटणीस आणि नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार योगेशदादा कदम यांच्यावर केला आहे*
    एकंदरीतच पाहिलं तर खेड नगर* *पालिकेने उदघाटन केलेल्या प्रास्ताविक कोव्हीड केयर सेंटर चांगलेच वादाच्या भोवऱ्यात पडले असून एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने शहर विकास आघाडीच्या नागराध्यक्षांना कोव्हीड केयर सेंटर बाबत टार्गेट केले आहे , मंगळवारी आमदार योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आता गरज नसताना आणि स्थानिकांचा व प्रशासनाचा विरोध असताना कोव्हीड केयर सेंटर कशासाठी ? कोणाच्या हट्ट आहे ? , खेड नगरपालिका कोव्हीड केयर सेंटर म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असून हे आपल्याला मान्य नाही असे सांगितले होते , याबाबत आज मनसेचे राज्य* सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आमदार योगेशदादा कदम यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे, आमदार योगेश कदम यांची राजकीय कारकीर्द आत्ता सुरु झाली आहे , त्यांनी आपणाला सल्ले देऊ नये , खेड एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक आरोग्य संघटना यांनी कोरोनाबाबत अधिक अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत, आता दसरा, दिवाळी येत आहे तसेच हिवाळ्यामध्ये सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो अशा काळात मागच्या वेळे प्रमाणे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही प्रस्तावित खेड नगर पालिकेचे कोव्हीड केयर सेंटर सुरु केले आहे,  येत्या चार ते पाच दिवसात त्या ठिकाणी तद्न्य डॉक्टर आणि इतर स्टाफ ची नेमणूक होईल , लोकांना दरम्यानच्या काळात लाखो रुपये देऊन खासगी कोव्हीड सेंटर मध्ये उपचार करावे लागले, आणि खेडमध्ये नगरपालिकेचे कोव्हीड सेंटर असावे अशी मागणी आणि प्रयत्न आमचे मार्च महिन्यापासून होते,  मात्र कोरोनाच्या कालावधी मध्ये नगरपालिकेची बैठक होत नसल्याने दिरंगाई झाली, ज्या काळात लोकांना धीर देण्याची वेळ होती त्या काळात आपण व आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होतो अजूनही करत आहे , सुरवातीच्या काळात घरात दोन महिने कोरोनटाईन राहणाऱ्यांना आता आम्हाला उपदेशाचे डोस देऊ नये, जेव्हा गरज होती तेव्हा आपले डेंटल कॉलेज कोरोना रुग्णांसाठी का शासनाला मागणी असून सुद्धा दिले नाही ?  खेड नगर पालिकेचे कोव्हीड सेंटर व्हावे हा आपला हट्ट होता हे आपण ठामपणे सांगत असून हे जनतेच्या सेवे साठी आहे, यासाठी आपण बंधन बँक, एचडीएफसी बँक, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हिराभाई बुटाला विचारमंच, कौस्तुभ बुटाला यांच्या सीएसआर फंडातून २५ लाख रुपयांची मदत ना सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मिळवली आहे, आमदार योगेशदादा कदम यांनी शहराच्या विकासाला आमदार फंडातून किती रुपये दिले हे त्यांनी जाहीर करून सांगावे, दर वेळी शहराच्या विकासाला खोड हे आमदार योगेश कदम यांच्या सांगण्यावरून सेनेचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर घालत असतात मग नागरिकांच्या विम्याचा प्रश्न असो, जनरेटरचा प्रश्न असो, उद्यानाचा विषय असो, अथवा खोके धारकांचा विषय असो दर वेळी कामात खोड घालण्याचे काम सेनेचे नगरसेवक आमदार योगेश कदम यांच्या आदेशानुसार करतात. आपण ग्रामीण भागातील कामांचं पहा वे शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे वैभव  खेडेकर यांनी सांगितले.