चिपळूण तालुक्यातील अंडरपास विषय आ. भास्कर जाधव यांनी लावला मार्गी

देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 
    केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असूनही आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूण शहरालगतच्या कापसाळ व कामथे या मोठ्या गावांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने आक्रमक होवून सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दिल्ली येथून राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे येथे आले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आ.जाधव यांनी सुचविलेल्या ठिकाणांपैकी कापसाळ दुकानखोरी-मोरेवाडी, कामथे माटे हायस्कूल येथे अंडरपास, कामथे हरेकरवाडी येथे फूट ओव्हरब्रीज करण्याचे निश्‍चित केले.