कोरोना च्या काळात प्रवासी अभावी लाखो रुपयांचे महाड आगारचे नुकसान ?

 


पोलादपूर/ लोकनिर्माण(निळकंठ साने)
          मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले व शेकडो बस गाड्या ज्या आगरात नोंदणी करून जातात त्या महाड आगाराचे भारमान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड आगर च्या बस सेवेने हिरावून घेतल्याने माहे लाखो नुकसान महाड आगारचे होत आहे कोविड च्या काळात बंद असलेली बस सुरू झाली असली तरी प्रवासी अभावी ती आर्थिक तूट भरून काढण्यात अपयशी ठरत असल्याने नवीन रूट व रात्र सेवा बस सुरू करणे गरजेचे बनले आहे 
          दापोली मंडणगड ला मुख्य महामार्ग शी जोडणारा आंबेत पूल नादुरुस्त झाल्याने या मार्गावरची वाहतूक गेल्या काही वर्षे पासून  बंद करण्यात आली असल्याने दापोली मंडणगड च्या बसेस महाड मधून नोयोजित ठिकाणी मार्गस्थ होत आहेत या मध्ये मुंबई, भाईंदर , विमानतळ, नालासोपारा,वसई,बोरिवली,पुणे पिंपरी चिंचवड, शिर्डी ,जामखेड, आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आंबेत मार्गे जात असतात मात्र सदरचा पूल गत वर्षे पासून बंद करण्यात आल्या नंतर  दापोली मंडणगड च्या एसटी बसेस महाड मार्गे मार्गस्त होऊ लागल्या.
       महाड आगरातून नोंदणी करत नियोजित ठिकणी जात आहेत या बसेस गाड्याचा फटका महाड आगारातील बसेल ला बसला असून दापोली मंडणगड वरून येणाऱ्या बहुतांशी बस गाड्या महाड येथे भरत असल्याने त्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे तर महाड चे प्रवासी या बसेस मधून प्रवास करत असल्याने महाड आगराचे उत्पन्न घटत आहे दर महिना महाड लाखो रुपयांचा  फटका या दोन्ही आगारचा बसेस मुले बसत आहेत त्यातचकोरोनाच्या काळा नंतर बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी शाळा महाविद्यालय बंद असल्याने सांयकाळीच्या व सकाळ परतीच्या फेऱ्या बंद आहेत अनेक विद्यार्थी बसेस मधून पास द्वारे प्रवास करत असतात मात्र शाळा बंद अभावी विद्यार्थी नसल्याने बसेस आर्थिक नुकसान होत आहे. महाड आगारात  दापोली मंडणगड च्या सुमारे 33 बसेस मुंबई ठाणे बोरिवली कडे मार्गस्थ रोज होत आहेत तर महाड आगाराच्या फक्त 22 गाड्या मार्गस्थ होत आहेत त्यातच महाड आगार मध्ये नवीन रूट चालू करण्यात येत नसल्याने अनेकदा चाकरमानी  मुंबई विभाग पुणे विभाग पालघर विभाग कडे संपर्क साधन नवीन सेवा सुरू करण्याची मागणी करत सेवा घेत आहेत.
       महाड आगार कडे लांब पल्ल्याची जळगाव व नाशिक, अक्कलकोट या बसेस सोडल्यास एकही बस सेवा उपलब्ध नाही शिर्डी बस सेवा कोपरगाव कडे वर्ग केल्याने आर्थिक फटका महाड आगाराला सोसावा लागला होता त्यातच महाड आगाराची कोल्हापूर सांगली मिरज सेवा बंद झाली आहे त्यातच चालक वाहक यांचाही कमतरता या महाड आगार मध्ये भासत असल्याने नवीन रूट वर बस सेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
         महाड पोलादपूर मध्ये खेड, चिपळूण, गुहागर ,देवरुख,लांजा,राजापूर, रत्नागिरी, मलकापूर, तळेगाव,भोर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, पारगाव खंडाळा आगारच्या गाड्या ये जा करत असतात  पारगाव खंडळाची स्वारगेट पारगाव वाई महाबळेश्वर मार्गे पोलादपूर बस सेवा सुरू आहे त्याच धर्तीवर पोलादपूर मधून महाड आगाराची बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे सातारा पोलादपूर , पोलादपूर खेड , पोलादपूर पनवेल आदी बसेस सुरू करणे क्रमप्राप्त बनले आहे.
        विभागीय  वाहतूक नियंत्रक पेण येथील कार्यालय कर्मचारी अधिकारी महाड आगारच्या मागणी कडे लक्ष देत नसल्याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आगाराची घेतला आहे या मध्ये खेड आगाराच्या पुण्याला जाणाऱ्या बसेस पोलादपूर महाड मार्गे जात आहेत तसेच काही वेळा त्या माणगाव मार्गे ताम्हणी घाट असा लांबच प्रवास करत जात असल्याने महाड पोलादपूर माणगांव चे प्रवासी या बस मधून प्रवास करताना दिसत आहेत 
        महाड आगरातून संध्याकाळी मुंबई पुणे कडे जाणाऱ्या बसेस सायंकाळी 7 नंतर नसल्याने अनेकदा प्रवासी खेड, चिपळूण, दापोली मंडणगड या डेपोच्या बसेस मधून प्रवास करत आहेत अन लॉक नंतर खेड आगरातून खेड महाड पुणे शयनाआसन बस सेवा नुकतीच सुरू केली आहे त्याच प्रमाणे तळ कोकणातील बसेस रात्री अडीच पर्यत महाड आगरातून प्रवेश करून मार्गस्त होत असतात.
       पोलादपूर स्थानकात चहा नाष्टा साठी बसेस थांबत असल्याने रात्रीच्या वेळी तेथील नियंत्रण कक्ष चालू ठवणे गरजेचे आहे पोलादपूर स्थानकातून ग्रामीण भागात जाणाऱ्या वस्तीच्या गाड्या बंद आहेत त्यातच मोजक्या फेऱ्या सुरू असल्याने अनेकदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ खासगी वाहनाचा आधार घेत आहेत
        परराज्यातील बसेस सुरू झाल्या नंतर गुजरात राज्यातील बसेस महाड व पोलादपूर मधून सोडण्यात येत आहेत अहमदाबाद पोलादपूर व सुरत महाड या बसेस सुरू झाल्या असल्याने भारमान चांगले मिळत आहे  रायगड नियंत्रण मंडळ कडून महाड किंवा इतर आगरातून गुजरात राज्यात बस सेवा नव्याने सुरू करणे गरजेचे आहे पोलादपूर सह महाड तालुक्यातील अनेक रहिवासी सुरत अहमदाबाद ठिकाणी नोकरी निमित्त वास्तव करत आहेत त्याच्या सोयी साठी जादा बसेस गुजरात राज्यातून सोडण्यात येतात त्यांना मिळणार प्रतिसाद पाहता त्या मार्गावर नव्याने बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे.