दौंड तालुक्यातील किसान युवा क्रांति संघटना यांच्या वतीने शेतकऱ्यांचा विविध समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन ..

 


पुणे-दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)


        दौंड तालुक्यातील किसान युवा क्रांति संघटना यांच्या वतीने  शेतकऱ्यांचा विविध समस्या असलेल्या निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष विकास माने व व त्यांचे सहकारी यांनी यवत विश्रामगृह येथे देण्यात आले पीक कर्ज वाटप नाकारणे एम एस पी नुसार शेतमाल खरेदी न करणे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाचे पंचनाम्यात दिरंगाई होत असल्याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले होते.


       
     महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश देऊन देखील बँक शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे कारणे सांगून शेती पिककर्ज  नाकारून अडचणीत आणत आहे तरी शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना शासनाने आदेश द्यावेत त्याचप्रमाणे परिसरातील बाजार समित्यांमध्ये व बाहेर व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एम एस पी पेक्षा फारच कमी दराने शेतमाल खरेदी करीत आहेत याबाबत बाजार समित्या व व व्यापारी यांना शासकीय स्तरावर एम एस पी नुसार शेतमाल खरेदीसाठी सूचना कराव्यात त्याचप्रमाणे दौंड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती व शेतमालाचे आतोनात नुकसान झालेले आहे त्याचे लवकरात लवकर योग्य प्रकारे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी व ज्या शेतकऱ्यांना शासकीय स्तरावर मदत  नाकारली जात आहे त्यांनी किसान युवा क्रांती संघटना यांच्याशी संपर्क पुढील नंबर वर 9970597886 करावा असे आव्हान किसान युवा क्रांती संघटना दौंड तालुका अध्यक्ष विकास माने यांनी केले आहे यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा भावी संस्था माहिती अधिकार विनायक दोरगे.  पुणे जिल्हा काँग्रेस असंघटित कामगार उपाध्यक्ष अरविंद  दोरगे मा.उपसंरपच सुभाष यादव  प्रहार दौंड तालुका युवक अध्यक्ष राहुल  दोरगे मा. चेअरमन वि.वि.सो.यवत आण्णा दोरगे उपस्थित होते.