आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या ( रत्नागिरी, राजापूर, देवरुख, चिपळूण, मुंबई)

कातळावर पालापाचोळ्याद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी
रत्नागिरी /सुुुुुनील जठार 



        रत्नागिरी तालुक्यातील गोळपसडा येथील प्रगतीशील शेतकरी जयंत जोशी यांनी सुका पालापाचोळा एकत्र करून वाफ्याद्वारे लागवडीच्या प्रयोगातून गुंठ्याला २०० किलो भात लावणीचा उपक्रम राबविला आहे. अपेक्षेनुसार भाताचे उत्पादन मिळेल असा विश्‍वास जोशी यांनी व्यक्त केला आहे.
कमी खर्चात, कमी वेळेत भाताचे जास्त उत्पादन मिळावे यासाठी जयंत जोशी यांनी हा प्रयोग केला आहे. भातशेतीत नाविण्यपूर्ण प्रयोग करणे ही काळाची गरज आहे. प्रायोगिक तत्वावर गोळपसडा येथील कातळावर जोशी यांनी भात लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कातळावर थोडी माती टाकून त्यांनी हा प्रयोग केला आहे.
     भाताचा पेंढा, सुका पालापाचोळा एकत्र करून त्यावर सहा इंच वाफ्याद्वारे भाताची रोपे तयार करण्यात आली आहेत. कातळावर टाकलेल्या मातीत पाण्याचा फवारा करून जमीन लागवडीयोग्य करण्यात आली. भाताचे बी पेरल्यानंतर केवळ २५ दिवसात त्याची रोपे तयार झाली.


                            ★★★


एसटी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांचे श्राद्ध आंदोलन सध्या स्थगित, बारा दिवसाची दिली मुदत
चिपळूण - देवरुख (संदीप गुडेेकर)



 सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन स्वतः एसीमध्ये बसायचे हेउद्योग झाले म्हणून ना? शिवसेना सर्वसामान्य लोकांसाठी सज्ज आहे. आता गयावया करूच नका दिलेला शब्द पूर्ण करा.आज थांबतोय पण हे कायमचे समजू नका.या पुढे १२ दिवसांची वेळ. त्यादिवशी उत्तरकार्य करायचे असते, हे लक्षात ठेवा. अशा शब्दांत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावले असून आज गुरुवारचे आंदोलन पुढे ढकलले आहे. चिपळूण एसटी स्थानकाचे काम सुरू झाले नाही तर याद राखा.. कधीही कोणत्याही वेळी स्थानकात येऊन ठेकेदार कंपनीचे श्राद्ध घालेन, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. चिपळूण एसटी स्थानकाचे काम रखडल्याबाबत गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी श्राद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे पूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबई-पुणे प्रदेशच्या मुख्य सापथ्य अभियंताविद्याभिलारकर, रत्नागिरी विभागाच्या सापथ्य अभियंता आदिती इनामदार, माजी विभागीय स्थापथ्य अभियंता पेंडकर, चिपळूण आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी कल बुधवारी पुन्हा एकदा संदीप सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच माजी आमदार शिवसेना नेते सदानंद चव्हाण यांनी देखील याबाबत समन्वयाची भूमिका घेतली आहे.


                      ★★★


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली 


        मुंबई/प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं. राज ठाकरेंनी राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा सल्लाही दिला आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी शरद पवार यांच्याशी बोलेन. फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेईन.
    लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे.


                          ★★★


 आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी 



राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना आणि लॉकडाउन यामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना  देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


                           ★★★


 राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेवू नये,- नामदार उदय सामंत
रत्नागिरी / सुनील जठार



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी शरद पवार  यांना भेटावे, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी राज ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेवू नये, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तसेच शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी स्पष्ट केलंउदय सामंत म्हणाले की, राज्यपालांनी मनसे अध्यक्षांना पवार साहेबांना का भेटायला सांगितलं?,हे त्यांनाच माहीत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हेदेखील मला माहीत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आपण अर्थ लावू तसे वेगवेगळे अर्थ लागू शकतात. पण महाराष्ट्राला माहीत आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे शरद पवार, सोनिया गांधी आणि राहूल गांधी या सर्वांशी चर्चा करून उद्धव ठाकरे सरकार चालवतात, हे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि हे सर्वांना मान्य आहे.
वाढीव वीज बिलांसदर्भात सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिलं आहे. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना बांधील नाही, असं सष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.