पुणे जिल्हा अधिकारी डाॅ.राजेंद्र देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये आपले कुटुंब आपली जबाबदारी दुसऱ्या टप्प्यातील योजनेची यवत ता.दौंड मधून सुरूवात .

पुणे /लोकनिर्माण(विनायक दोरगे)
     पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी राज्य सरकारच्या आपले कुटुंब आपली जबाबदारी योजनेची सुरुवात दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी भर पावसात सुरू केली,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्या मार्फत प्रत्येक कुटूंबामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचे राज्य सरकार चे धोरण असून त्यानुसार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत याच योजनेचा दुसऱ्या टप्पाला आज पुणे जिल्ह्यातील यवत गावातून सुरू करण्यात आला,बुधवारी पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत या ठिकाणी एका कुटुंबातील नागरिकांची तपासणी कशा प्रकारे होत आहे हे स्वतः उपस्थित राहून पाहिले या कुटूंबाला त्यांनी आपल्याला आरोग्य विभागाच्या वतीने कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत का आपण कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात याची माहिती घेतली,पहिल्या टप्प्यात  आपले कुटुंब आपली जबाबदारी या अभियाना मुळे जिल्ह्यातील कोरोना चा संसर्ग कमी करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.


         
       यावेळी महसूल उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार ,जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे,आरोग्य अधीक्षक शशिकांत इरवाडकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,, पंचायत समिती सभापती आशा शितोळे उपसभापती नितीन दोरगे,पंचायत समिती सदस्य निशा शेंडगे,कुंडलिक खुटवड. संदानंद दोरगे. इम्रान तांबोळी,सुभाष यादव. अरविंद दोरगे. विकास माने. आण्णा दोरगे . आदी उपस्थित होते.