नवरात्रौत्सवात महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी यासाठी राज्यसरकार आग्रही  - ना. अस्लम शेख

             


 मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे )


    मुंबईत महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी यासाठी राज्यसरकारने पालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत १३ ऑक्टोबरला बैठक घेऊन महिलांंसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रेल्वे सेवा महिलांसाठी सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. रेल्वे बोर्डाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे , अटी व शर्ती लागू करण्यात आल्याने व रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता न मिळाल्याने  महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु होण्यास  विलंब लागत असल्याचे मत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले.
आपण स्वत: रेल्वेसेवा सुरु करण्यासंदर्भात केंद्रिय रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे ना. अस्लम शेख यांनी शेवटी सांगितले.