कोकण रेल्वे मार्गावर मुंबई आणि मडगाव दरम्यान२४ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत  विशेष रेल्वे धावणार


ठाणे/लोकनिर्माण (संदेश जिमन)


        उत्सव काळात रेल्वेने कोकणवासियांसाठी खुशखबर दिली आहे. रेल्वे मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत मडगावहून दररोज ४.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसर्‍या दिवशी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.
ही उत्सव विशेष एक्सप्रेस २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १२ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.
      दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी या ठिकाणी ही रेल्वे थांबेल.या उत्सव विशेष साठी ट्रेनच्या बुकिंगला सुरुवात झालीय. बुकिंग विशेष शुल्कासह आधीच सुरु असून विशेष संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
     केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image