सुप्रसिद्ध साहित्यिक भारत कवितके यांचे "आयुष्य उसवताना " आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर

               


 मुंबई/लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)


मुंबईतील कांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक भारत कवितके यांचे  " आयुष्य उसवताना " हे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. साहित्यिक भारत कवितके यांचा खडतर जीवन प्रवास रेखाटन करण्यात आलेल   "आयुष्य उसवताना " हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार असल्याचे भारत कवितके यांनी सांगितले. सुप्रसिध्द साहित्यिक भारत कवितके हे  कवि, लेखक, मुक्त पत्रकार , परीक्षक, समिक्षक , धनगर समाजाच्या सामाजिक चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्ते , माजी होमगार्ड अधिकारी 'के' परीमंडळ कांदिवली चे  समादेशक अधिकारी , बोरीवली येथील मुंबई महानगर पालिका आरोग्य खाते भगवती मनपा सर्व साधारण रूग्णालयातील शस्त्रक्रियागार सहायक पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. भारत कवितके हे विविध उल्लेखनिय कामाबद्दल अनेक राज्यातून राष्ट्रीय व राज्य पातळीवर मिळालेल्या १००० (एक हजार) पुरस्काराचे मानकरी आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थाच्या लहान मोठ्या पदावर आपले कार्य  चोख आणि , प्रामाणिकपणे ,निष्ठेने बजावत आहेत.आतापर्यंत भारत कवितके यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली असून सहा ही पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या जीवनातील  संघर्षमय पण यशस्वी वाटचालीचे आत्मचरित्र ' आयुष्य उसवताना ' दै. वृत्त मानस, दै.तुफान क्रांती सांगोला, दै.आदर्श महाराष्ट्र मुंबई, दै.चौफेर संघर्ष वसई, दै.राम दिन, दै.डहाणू मित्र , दै.साक्षीवंदना, सा.मुंबई संध्या गोरेगाव, सा.अहिल्या वार्ता, सा.अहिल्या सरकार, वगैरे वर्तमान पत्रातून भारत कवितके यांनी सातत्याने लिखाण केले आहे . तसेच अनेक मासिकातून ,पाक्षिकातून, साप्ताहिकातून कथा, कविता, लेख, प्रवास वर्णने, पुस्तक परीक्षण , अभिप्राय आदि लिखाण प्रसिध्द झाले आहे. तर पुणे एक्सप्रेस न्यूज चैनल, आदर्श महाराष्ट्र न्यूज चैनल, जयमल्हार न्यूज चैनल, रामदिन न्यूज चैनल, धनगर शक्ती न्यूज चैनल, वगैरे न्यूज चैनलला सातत्याने बातम्या प्रसिध्द होत असतात.भारत कवितके यांच्या लिखाणाला मोठ्या प्रमाणात वाचकांनी दाद दिली आहे . विशेषतः भारत कवितके यांच्या पुरस्कारांची संख्या १००० झाल्याने याची गिनिज बुकात विक्रमी नोंद करण्यासाठी भारत कवितके प्रयत्नशिल आहेत. या पुढे देखील समाजातील तळागाळातील लोकांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सदैव सामाजिक कार्य करणे आणि, साहित्य क्षेत्रातही लिखाण करून भरीव कामगिरी करण्याचा मानस आहे असे भारत कवितके यांनी मनोगत व्यक्त केले.


Popular posts
कवितांजलीचे व्हॉटसअप विडिओ रुपात प्रथमच ऑनलाईनद्वारे आगळे वेगळे कविसंमेलन
Image
७५ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास तर सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव येथील जागेवर उभारण्याचा प्रस्ताव
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image