ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिनं त्याच भूमिकेत राहावं. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत-.अमृता फडणवीस यांच्यावर शिवसेनेची जोरदार टीका


मुंबई /लोकनिर्माण
        मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांन देण्यात आलं आहे.मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत शरसंधान साधलं. 'ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,' असं राऊत म्हणाल्या.
       ती मा. मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिनं त्याच भूमिकेत राहावं. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,' असं प्रत्युत्तर राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिलं.
www.konkantoday.com