शृंगारतळी येथे अज्ञात वाहनाने पादचार्‍यांला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू

 


गुहागर /प्रमोद आंब्रे


       गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ ते गोल्डन बेकरी या कच्च्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने विजय मोहिते या पादचाऱ्यांना चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला विजय मोहिते हे रस्त्यावरून जात असताना या रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व हे वाहन मोहिते यांच्या अंगावरून गेल्याने त्याच्या पायाला, डोक्याला, शरीरावर गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातातील फरारी वाहन व वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.