"कविता ही जाणिवांचा आणि कल्पनांचा आविष्कार आहे,,," - राजन लाखे

मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे)


     कवितांजली: पर्व ३ मधील पाचवे मासिक कविसंमेलन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न. 
विकास व संशोधन प्रतिष्ठान (DRF) आयोजित मराठी भाषा विकास प्रकल्प अंतर्गत 'कवितांजली' च्या तिसर्‍या पर्वातील पाचवे आणि लाॅकडाऊन काळातील सातवे मासिक कविसंमेलन १८ऑक्टोबर, २०२० रोजी, "शरदसुधा" या नावाने ऑनलाईन पद्धतीने उत्साहात संपन्न झाले. 
डॉ.लक्ष्मण शिवणेकर व विशेष अतिथी ज्येष्ठ साहित्यिक लेखक,कवी,गीतकार, गझलकार सन्माननीय राजन लाखे यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भवन विकासक, शिक्षण संस्था संचालक श्रीपत मोरे, वरिष्ठ समीक्षक, परीक्षक आणि कवी शिवाजी गावडे, उद्योजक, समाजसेवक शंकर जंगम, लायन दीपक मोरे, अॅड. अभिजीत मोरे, प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ.वसुंधरा शिवणेकर कवितांजलीचे अध्यक्ष व संप्रेरक डॉ.लक्ष्मण शिवणेकर आणि विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे ऑनलाईन उपस्थित होते. 
    मराठीतील श्रेष्ठ कवी  केशवसुत, ग, दि, माडगूळकर,आणि शांता शेळके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, तसेच कवितांजली परिवारातील आणि मुंबईतील नामांकित शल्यचिकित्सक डॉ, रमेशसिंग यांचे 8 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, विजय म्हामुणकर यांनी उत्तम सूत्रसंचालन करताना प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे स्वरूप सांगून शेवटी सर्वांचे आभार मानले. 


       
     संमेलनाचे विशेषअतिथी राजन लाखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कवितांजलीने आपल्या कार्यातील सातत्य राखल्याबद्दल गौरवोद्गार काढले, कवितेविषयी बोलताना ते म्हणाले:  "कवितेचा सुगंध सकाळी प्राजक्तासारखा, दिवसभर चाफ्यासारखा आणि सायंकाळी रातराणीसारखा दरवळत असतो, कविता ही जाणिवांचा आणि कल्पनांचा आविष्कार आहे," कवितांजलीच्या माध्यमातून कवीची प्रतिभा बहरत जाण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण शिवणेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले: " "चांगली कविता सत्याधारित असते,कल्याणकारी असते आणि ती सौंदर्याकृती कोमलांगी असते," सर्व कवींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. डॉ.शिवणेकरांनी 
" शरदसुधा " ही स्वरचित कविता सादर करून कविसंमेलनाची आश्वासक सुरुवात केली. कवी राजन लाखे यांनी "वेळ कोणासाठी कधी थांबतो का रे" ही प्रेरक कविता गाऊन सादर केली.
     सदर कविसंमेलनात महाराष्ट्रातील भंडारा,अमरावती,नाशिक,सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे परिसरातील एकूण ३१ कवी_कवयित्री सहभागी झाले होते, अतिथी आणि मान्यवर यांनी ... 
शरद ऋतूचे आगमन, सृष्टीतील परिवर्तन,पृथ्वी आणि आकाशाचे देखणे रूप, चंद्र चांदण्या, निरभ्र आकाश चंद्रप्रकाश, कोजागिरी, रास, धुंद मैफिल , नाच गाणे,शरद तराणे,नवरात्री उत्सव, विजयोत्सव असे शरदॠतूच्या अनेक रंगांचे दर्शन घडविणाऱ्या सुंदर रचना सादर केल्या, कविसंमेलन बहारदार केले. मान्यवरांसह सहभागी कवींनी घरातच राहून सहकुटुंब सहपरिवार कवितांचा आस्वाद व आनंद घेतला. सहभागी कवींना आॅनलाईन सन्मानपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले, श्री.प्रसाद गाळवणकर यांनी नेहमी प्रमाणेच तांत्रिक बाजू सांभाळून परिश्रमपूर्वक सहकार्य करून योगदान दिले. त्यामुळे कविसंमेलन दर्जेदार व बहारदार झाले. सुखद अनुभव घेता आला. कविसंमेलनाची सांगता आपल्या राष्ट्रगीताने सन्मानपूर्वक करण्यात आली. 


आॅनलाइन सहभागी कवी:
डाॅ.लक्ष्मण शिवणेकर, राजन लाखे, शिवाजी गावडे, श्रीपत मोरे, शंकर जंगम, विजय म्हामुणकर, अनंत जोशी, लक्ष्मण शेडगे, अनिल राव, प्रकाश वैद्य, अशोक कुलकर्णी, जयवंत हापन, सुलभा गोगरकर, विठ्ठल घाडी, स्नेहा साळुंके, शांतिलाल ननावरे, वैशाली भागवत, शामराव सुतार, मानसी जोशी, हरी धारकर, सायली कुलकर्णी, चंद्रशेखर धर्माधिकारी, सरोज गाजरे, वंदना बिरवटकर , कमलाकर गवळी, रेखा आंग्रे, दया घोंगे, दामोदर डहाळे, संध्या बनकर, वैभव उपासनी, अस्मिता मेश्राम उपस्थित होते.