अल्पवयीन मुलीकडुन वेश्याव्यवसाय करून घेणारा नराधम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पाटस टोल नाक्या शेजारील प्रकार उघडकीस आणि सोलापूर हायवेवर चुकिच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनाने घेतला पशुवैद्यक डाॅ. विलास बबन तवर यांचा निष्पाप जीव नक्की याला जवाबदार कोण ..?

        
                             


पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे) 
     पुणे सोलापूर महामार्ग वर काल संध्याकाळी ७ वा. मालवाहतूक करणारा टेम्पो मुख्य रस्त्यावर थांबलेला  असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराची पुढील वाहनांचा अंदाज नआल्याने जोरदार धडक बसुन अपघात झाला.
      मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावर   मालवाहतूक  करणारा  टेम्पो क्र  MH16 Q3376 मुख्य रस्त्यावर पार्किंग करून ड्रायव्हर निघून गेला होता पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वार पशुवैद्यकीय डॉक्टर विलास बबन तवर वय 52 यांना थांबलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने पाठीमागून जोरदार धडक बसली त्यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
       रस्त्यात वाहन उभे करून टेम्पो ड्रायव्हर दारू पिण्यासाठी गेला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती त्यामुळे एक निष्पाप बळी गेल्याने शेतकरी व सर्वसामान्य जन माणसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे  डॉक्टर तवर हे खूपच मनमिळावू स्वभावाचे होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मुख्य  रस्त्यामध्ये होणारे बेकायदा पार्किंग त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे होणारे अपघात तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेले खड्डे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असेच अपघात काहीच दिवासा पुर्वी येथे घडलेले आहेत.  नाहीतर असे निष्पाप बळी जाणे हे नित्याचे झाले आहे.
त्याचप्रमाणे मुख्य महामार्गावर यवत मध्ये प्रवेश करत्यावेळी संध्याकाळी अंधार असल्याने नागरिक रस्ता ओलांडताना देखील अपघात होत असतात त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी डीवाईडर वर दिवे बसविणे गरजेचे आहे याकडे देखील प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे ...
कारण अशा निष्पाप लोकांचा बळी जाण्या मागे जबाबदार कोण ,,,,?


                                  ★★★
 अल्पवयीन मुलीकडुन वेश्याव्यवसाय करून घेणारा नराधम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पाटस टोल नाक्या शेजारील प्रकार उघडकीस ...


पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे) 
       पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्याजवळ प्रवीण शिंदे नावाचा इसम हा काही दिवसापासून अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समजतात त्यांच्या पथकाने  ही उल्लेखनीय कामगिरी करत आरोपीला अटक केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दि.७.१०.२०२० रो.सापळा रचून पाटस गावच्या हद्दीत टोलनाक्याजवळ सोलापूर पुणे लेनच्या दक्षिणेस सुलभ सोचालय च्या पश्चिमेस मोकळ्या जागेमध्ये आरोपी प्रवीण रामदास शिंदे वय २७ राहणार यळपणे ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर. पीडित मुलगी वय  १७ राहणार दौंड. ता. दौंड जिल्हा पुणे हिचे कडून अनैतीक शाररीक व्यापार करून घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले.


           


     त्याच्याकडून एकुण ३९.१०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे  स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४.५.७ व ८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
 पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ श्री अभिनव देशमुख. अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- पृथ्वीराज ताटे.सफौ- सागर चव्हाण पोह- मुकुंद अयाचीत.पोहवा- महेश गायकवाड.पोहवा-निलेश कदम.पोहवा- उमाकांत कुंजीर. पोहावा- सचिन गायकवाड मपोहवा- लता जगताप. पोना- सुभाष राऊत. पोना- गुरूनाथ गायकवाड. पोशि- अक्षय जावळे यांनी ही कारवाई केली.