अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही..दौंड तालुक्यातील देलवडी येथिल गुऱ्हाळा सिल. नागरिकांच्या आरोग्यशी खेळ थांबणार कधी...?

 


पुणे-दॊंड /लोकनिर्माण (विनायक दोरगे)
      दौंड तालुक्यातील देलवडी येथील गुऱ्हाळा मध्ये प्लास्टीक तसेच आळया व कीडे पडलेले खराब चाॅकलेट चा वापर होत असल्याचे आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी राजा संघर्ष कृती समिती दौंड तालुका अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांना माहीती मिळताच त्यांनी अन्न औषधे प्रशासनाच्या आधिकार्यांशी संपर्क साधुन कार्यवाही ची मागणी केली. त्याप्रमाणे अन्न औषध प्रशासन विभागाच्या आधिकार्यांनी देलवडी येथे कार्यवाही केली.


     
        स्थानिक नागरिकांनी परप्रांतीयाना गुऱ्हाळ भाडे तत्वावर दिलेली असून ठेकेदार देखिल कमी पैशात जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी गूळ बनवताना त्यामध्ये अनेक बंदी असलेल्या केमिकलचा मारा करत गुळाची चमक वाढवत आहेत. हे कमी की काय म्हणुन  गुऱ्हाळामध्ये टायर . प्लास्टिक  कचऱ्याचा वापर भट्टी पेटवण्यासाठी केला जात आहे त्यामुळे हेवीतील प्रदुषण हि मोठया प्रमाणावर होत आहे. अक्षरक्षः अळ्या व कीडे पडलेले खराब चाॅकलेट गुळ उत्पादन करण्यासाठी वापर होत असेल, तर गूळ उत्पादक नागरिकांच्या आरोग्यासोबतच खेळ करत आहेत.


   


      सदर  गुऱ्हाळ अन्न औषधे प्रशासन विभागाने सिल करून. तेथिल गुळाचे नमुने तपासणी साठी पाठवल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली....
त्याच प्रमाणे चांगल्या प्रतीचा किंवा सेंद्रिय पध्दतीने गुळ तयार करणारे  गुऱ्हाळा धारक शेतकरी परप्रांतीय गुऱ्हाळा  चालकांमुळे  अडचणीत येत असल्याचे दिसते ...