दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार ८१२ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत दोन मोटारसायकल वरील चार जण गेले पूरामध्ये वाहुन तीन मृतदेह सापडले

पुणे-दॊंड/लोकनिर्माण ( विनायक दोरगे)


दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार 812 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत दोन मोटारसायकल वरील चार जण गेले पूरामध्ये वाहुन तीन मृतदेह सापडले.
     पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असुन दौंड तालुक्यात  पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. नदी ओढे नाले यांना पुर आल्याने शेती व शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. 


         
     दौंड तालुक्यात पावसाने गेल्या पाचदिवसा पासुन अक्षरशः थैमान घातले असुन त्यामध्ये राजेगाव खानवटे रस्त्यावरून दोन  दुचाकीस्वार पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले त्या  मध्ये चार जणांना आपले प्राण गमवावे लागले . पाळीव जनावरे देखील पाण्यात वाहुन गेल्याचे प्रकार ही घडल्याचे दिसुन आले. अतिवृष्टीमुळे पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेल्या गावांना हि पावसाचा चांगलाच फटका बसलेला दिसुन येत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर पुराचे पाणी आल्याने दौंड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक व पोलिस कर्मचारी व ग्रामस्थ यांनी प्रसंगावधान दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणत महामार्गा वरील वाहतुक नियंत्रणात ठेवल्याने पुढे होणारी जीवीत हानी टळली.
दौंड तालुक्यात ८१२ मिलीमीटर विक्रमी पाऊसाची नोंद झाली असुन पुर्व भागात सर्वात जास्त खडकी रावनगाव येथे दोन तासा मध्ये १६५ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे  .रावणगाव १५७.पाटस १००. वरवंढ ९५. केडगाव ९१. दौंड ८५. देऊळगाव राजे१४०.यवत ७४.राहु ६८.  तालुक्यातील  पावसाची नोंद दौंड तहसीलदार कार्यालयात झाली असुन . पुणे जिल्हा अधिकारी  डाॅ.राजेश देशमुख दौंड तालुका  दौऱ्यावर वर असताना यवत येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध संघटनानी वेळेत अतिवृष्टी संबंधित पंचनामे व नुकसान भरपाईची निवेदनाद्वारे मागणी केली असता तत्काळ जिल्हा अधिकारी यांनी प्रांताधिकारी तहसीलदार व बीडिओ यांना लवकरात लवकर पंचनामे करून घेण्याचे  आदेश दिले आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यांनी बऱ्यापैकी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून आता पंचनामे पूर्ण झाल्यावर  नक्की नुकसान किती झाले हे समजून येईल व शासन पीडितांना लवकरात लवकर  मदत मिळून देते का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.